आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीएमडब्ल्यूने लाँच केले एक्स ३, एक्स ५ चे नवे मॉडेल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जर्मन कार निर्माता कंपनी बीएमडब्ल्यू सध्याच्या कारचे पेट्रोल मॉडेल आणण्यावर काम करत आहेत. बीएमडब्ल्यूची ३ सिरीज जीटी भारतात लाँच करताना बीएमडब्ल्यूच्या भारतातील अध्यक्षांनी म्हटले होते की, आगामी काळात बीएमडब्ल्यूची पूर्ण लाइन-अप मार्च २०१७ पर्यंत पेट्रोल इंजिन मॉडेलमध्ये समाविष्ट होईल. त्याचबरोबर अशी शक्यता वाढली होती की, कंपनी वर्षअखेरपर्यंत पेट्रोल आवृत्तीत काही नवे मॉडेल लाँच करू शकते. अलीकडेच बीएमडब्ल्यूने एक्स ३ आणि एक्स ५ एसयूव्हीची नवी पेट्रोल आवृत्ती लाँच केली आहे. त्यांना एक्स ३ एक्स ड्राइव्ह २८ आय आणि एक्स ५ एक्स ड्राइव्ह ३५ आय नावाने लाँच केले आहे. हे दोन्ही मॉडेल सध्याच्या डिझेल आवृत्तीपेक्षा एक लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीत लाँच केले आहे. डिझाइनमध्ये विशेष बदल केलेले नाहीत. त्यांचे सुटे भाग चेन्नईत जोडण्यात आले आहेत.

बीएमडब्ल्यू एक्स ३ एक्स ड्राइव्ह 28i
- त्यात चार सिलिंडरचे २ लिटर ट्विन पॉवर टर्बो पेट्रोल इंजिन असेल, ते २४५ एचपी पॉवर आणि ३५० एनएन टॉर्क तयार करेल.
- कंपनीनुसार ती ६.५ सेकंदांत ० ते १०० किमी प्रतितासाचा वेग घेऊ शकेल.
- त्यात ड्रायव्हिंग चांगले व्हावे यासाठी ८ स्पीड ऑटो स्टेपट्रॉनिक ट्रान्समिशन दिले आहे.
- त्याचे मॉडेल अल्पाइन व्हाइट (नॉन मेटॅलिक), मेटॅलिक ब्लॅक सफायर, डीप ब्लू आणि मेलबॉर्न रेड या रंगात असतील.
- त्याच्या लूकमध्ये डिझेल मॉडेलमध्ये फार बदल केले नाहीत. त्यात बाय जेन हेडलाइट्स, डे लाइट रनिंग एलईडी, एलईडी फॉगलाइट, पॅनोरमा ग्लासरूफ आणि २- झोन क्लायमेट कंट्रोल दिले आहे.
- इक्विपटमेंट म्हणून त्यात फ्रंट आणि रिअर पार्किंग सेन्सर, पार्किंग कॅमेरा, नेव्हिगेशनसह आयड्राइव्ह इन्फर्मेशन सिस्टिम, थ्रीडी मॅप, २०५ वॅटचे हायफाय ९ स्पीकर ऑडिओ सिस्टिम आणि एअर बॅग, स्टॅबिलिटी कंट्रोल आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिमसारखे काही सिक्युरिटी फीचर दिले आहेत.
- त्यात २२.३ सेंटिमीटरचा हाय डेफिनेशन कलर डिस्प्ले दिला आहे.
- तिची स्पर्धा मर्सिडीज जीएलसी ३०० आणि लँड रोव्हर डिस्कव्हरी स्पोर्टशी होईल. मर्सिडीझ जीएलसी ३०० तिच्यापेक्षा ३ लाखांनी स्वस्त आहे, तर लँडरोव्हर डिस्कव्हरी स्पोर्ट सुमारे १.५ लाख रुपयांनी महाग आहे.

पाॅवर : २४५ एचपी
टॉर्क : ३५० एनएम
मायलेज : १३.७७ किमी/लि.
टॉप स्पीड : २३० किमी/तास
इंधन टाकी : ६७ लिटर
बातम्या आणखी आहेत...