आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Book Your Bajaj V15 At Just Rs 499 And Get Online Offers

\'बजाज V15\' बाईकची बुकिंग फक्त 499 रूपयांत, एका आठवड्यात डिलिव्हरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- बजाज ऑटोने आपली बहुचर्चित ‘बजाज V15’ लॉन्च केली आहे. 23 मार्चपासून बाईकचे बुकिंग आणि डिलिव्हरीही सुरु झाली आहे. ई-कॉमर्स वेबसाईट ‘बाईकदेखो डॉट कॉम’ने ग्राहकांसाठी खास ऑफर दिली आहे. बाईकप्रेमींना ‘बजाज V15’ बाईक केवळ 499 रुपयांत बुक करता येणार आहे. बुकिंगनंतर एका आठवड्यात बाईकची डिलिव्हरी दिली जाणार आहे.

बजाज V15 च्या रुपात INS विक्रांतचा नवा अवतार...
देशातील पहिली विमान वाहतूक करणारी युद्धनौका 'INS विक्रांत'च्या मेटलपासून ही बाईक बनवण्यात आली आहे. INS विक्रांत आता अस्तित्वात नसली तरी Bajaj V च्या रुपात तिचा नवा अवतार समोर आला आहे. बजाज ऑटोमोबाइल कंपनीने या नौकेच्या पोलादापासून (मेटल) बाईक बनवली आहे.

बजाज ऑटोचे अध्यक्ष (मोटरसायकल बिझनेस) एरिक वॉज यांनी सां‍गितले, की साडेतीन दशकांपासून देशाची सेवा करणार्‍या अजिंक्य विक्रांतची कामगिरी विसरुन चालणार नाही. यासाठी आम्ही विक्रांतचे मेटल खरेदी केले. ते वितळवून Bajaj 'V' बाइकची निर्मिती करण्‍यात आली आहे.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, बजाज V15 चे खास वैशिष्ट्‍ये...