आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bugatti Chiron Revealed: 1,480 Hp And 0 62 Mph In Under 2.5 Second

Bugatti ची फास्टेस्ट सुपरकार Chiron लॉन्च, अडीच सेकंदात घेते 100चा स्पीड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- जिनेव्हा मोटर शोमध्ये फ्रान्सची कार निर्माता कंपनी 'बुगाटी'ने आपली नवी स्पोर्ट्स सुपरकार 'शिरॉन' (Chiron) सादर केली. शिरॉन ही जगातील फास्टेस्ट सुपरकार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. डोळ्याची पापणी लवत नाही, तितक्यात ही कार 100 चा स्पीड घेतले. कारचा टॉप स्पीड 417 Kmph इतका आहे.

'बुगाटी'ची स्पोर्ट्स सुपरकार 'शिरॉन'चे स्पेसिफीकेश...
- शिरॉन ही पूर्णपणे न्यू जनरेशनची कार आहे.
- 1995 किलोग्रॅम वजन असूनही या कारचा स्पीड 417Kmph
- शिरॉनमध्ये 1,500 हॉर्स पॉवरचे इंजिन
- शिरॉनची किंमत 19 कोटी रुपये
- डिसेंबर 2016 पर्यंत ही कार बाजारात उपलब्ध होईल.

नव्या कारविषयी काय म्हणजे कंपनी...
- 'काही व्यक्तिंच्या सवयी फारच निराळ्या असतात. ते मर्यादा तोडतात आणि विक्रम प्रस्थापित करत जातात.', बुगाटी ऑटोमोबाइल्स एसएएसचे प्रेसिडेंट वोल्फँग दुरहीमेर यांनी म्हटले आहे.
- 'बुगाटी' शिरॉन बाबतही असेच काहीसे घडले आहे. त्यामुळे या कारला आम्ही आणखी शानदार बनवण्याचा प्रयत्न केला आहे.

रेसिंग ड्रायव्हर शिरॉनवरून ठेवले कारचे नाव
- रेसिंग ड्राइव्हर लुई शिरॉन याच्यावरून बुगाटीने आपल्या नव्या कारचे नाव ठेवले आहे.
- 3 ऑगस्ट 1899 ला मोनाकोमध्ये जन्मलेले अलेक्सांद्र शिरॉन रेसिंग ड्रायव्हर होते.
- शिरॉनने अनेक कार रॅलियों, स्पोर्ट्स कार रेसिंग व ग्रां प्रीमध्ये सहभाग घेतला होता.
- शिरॉन फॉर्म्युला वनमध्ये सर्वाधिक वयाचे रेसर होते.
- 1955 मध्ये मोनाको ग्रां प्रीमध्ये शिरॉन स्पर्धेत सहाव्या क्रमांकावर होते. तेव्हा त्यांचे वय 55 होते.

पुढील स्लाइडवर वाचा, 'बुगाटी'ची नवी स्पोर्ट्स सुपरकार 'शिरॉन' (Chiron) चे फोटो...