आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मर्सिडीझने लाँच केली सर्वात महागडी कार; अमेरिकेतील किंमत 2.17 कोटी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॉस एंजलिसमध्ये झालेल्या ऑटो शोमध्ये मर्सिडीजने ‘मायबॅक एस 650 कॅब्रिओले’ कारला लाँच केले. ज्या कारचा वरील भाग उघडा असतो त्याला कॅब्रिओले असे संबोधले जाते. सध्या लाल, पांढरी आणि निळ्या रंगात उपलब्ध असून रंगाचे इतर शेड बनवण्याचे काम सुरू आहे. रोल्स रॉइस आणि बेंटलेसारख्या कारशी या कारची स्पर्धा आहे.

मायबॅक एस 650 कॅब्रिओले
> केवळ 300 गाड्यांची निर्मिती
> 2017 मध्ये विक्री सुरू होणार
> अमेरिकेतील किंमत 2.17 कोटी रुपये.
> 4.1 सेकंदात 100 कि.मी गती, सर्वाधिक गती 250कि.मी.
> एका लिटरमागे 8.3 कि.मी.चा मायलेज
> गाडीसोबत सीट लेदरसोबत बनलेल्या बॅगा मिळतील

भारतात पाच कोटींच्या जवळपास असणार किंमत
125 टक्के आयात शुल्काच्या हिशेबाने ही कार भारतात आयात केल्यास याची किंमत 4.88 कोटी असू शकते. नोंदणी आणि इतर आकार वेगळे लागतील. वास्तविक पाहता मर्सिडीझने भारतात बुलेटप्रूफ कार लाँच केली होती. याची किंमत 9.5 कोटी ठेवण्यात आली होती.

पुढील स्लाइडवर पाहा, मर्सिडीजची सर्वात महाग कार 'मायबॅक एस 650 कॅब्रिओले'चे स्पेेसिफिकेशन्स...
बातम्या आणखी आहेत...