आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माेटारी सुसाट, दुचाकी विक्रीचा ब्रेक फेल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - वाहन उद्याेगाच्या कामगिरीत सुधारणा हाेण्याचा वेग मंदावलेला असला तरी यंदाच्या मे महिन्यात माेटार विक्रीने मात्र ितसरा िगअर टाकला अाहे. माेटार विक्रीत सलग सातव्या महिन्यात ७.७३ टक्क्यांची वाढ झाल्यामुळे कंपन्यांना माेठा िदलासा िमळाला अाहे, परंतु माेटारसायकल विक्रीच्या बाबतीत मात्र िचंतेचे वातावरण अाहे.

वाहन उद्याेगाच्या काही क्षेत्रांमध्ये हळुवार सुधारणा हाेत अाहेत, तर काही विभागांमध्ये चांगली वाढ झाली अाहे. माेटारीसारख्या विभागात घसरणीचा कल असताना काही प्रमाणात वाढही हाेत असल्याचे साेसायटी अाॅफ इंिडयन अाॅटाेमाेबाइल मॅन्युफॅक्चरर्स या संस्थेचे महासंचालक विष्णू माथूर यांनी सांिगतले.

कामगिरी खराब : ग्रामीण अर्थव्यवस्थेत सुधारणा हाेत नसल्याने माेटारसायकली अाणि हलक्या व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत घट हाेत अाहे. गेल्या वर्षातील सप्टेंबरमधील वाढीचा अपवाद वगळता हलक्या व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत गेल्या २५ महिन्यांपासून घसरण हाेत असल्याचे माथूर यांनी सांिगतले. बँकांनी व्याजदर कमी केल्यामुळे त्याचा फायदा ग्राहकांपर्यंत पाेहोचून मागणी वाढेल, असा अाशावादही त्यांनी व्यक्त केला.

स्कायमेटच्या मान्सून अंदाजाचा अाधार
‘स्कायमेट’ या संस्थेने यंदाच्या वर्षात चांगला पाऊस हाेण्याचा अंदाज व्यक्त केल्यामुळे वाहन उद्याेगाला िदलासा िमळेल, अशी अपेक्षा माथूर यांनी व्यक्त केली. ‘सियाम’ ही संस्था वाहनांसाठी स्कायमेटच्या अंदाजाचा पाठपुरावा करते.