आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता एटीएममधून काढा कार, दुचाकीचा विमा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- कार किंवा दुचाकीचा विमा आता तुम्ही एटीएममधून काढू शकणार आहात. ज्याप्रमाणे एटीएममधून बँकेतील जमा, पैसे ट्रान्सफर या सुविधा मिळतात, त्याचप्रमाणे एटीएम मशीनच्या स्क्रीनवर वाहन विमा असा पर्याय असणार आहे. वाहनाची माहिती टाकून तुम्ही त्याच वेळी विमा करू शकता. त्याचा प्रीमियम देखील त्याच वेळी तुमच्या खात्यातून भरला जाईल. यासंबंधी विमा नियामक इरडा लवकर रिझर्व्ह बँकेशी याबाबत चर्चा करणार आहे. इरडा लवकरच ई-मोटार विमा देखील सुरू करणार आहे. नवीन वर्षात तेलंगणामध्ये आधीच ही सुविधा सुरू झाली आहे. यामध्ये स्मार्टफोनवर क्यूआर कोड देण्यात येईल. पोलिस किंवा इतर अधिकार प्राप्त संस्था त्याला व्हेरीफाय करेल. या डिजिटल पॉलिसीमुळे कागदपत्रे सांभाळायची आवश्यकता भासणार नाही. तसेच विमा किमती देखील कमी होतील.