आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीईएसमध्ये सादर होणार नव्याकोऱ्या कार्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑल इलेक्ट्रिक शेवरोले बोल्ट चर्चेत राहणार - Divya Marathi
ऑल इलेक्ट्रिक शेवरोले बोल्ट चर्चेत राहणार
लास वेगासमध्ये ३ ते ६ जानेवारीदरम्यान सीईएस (कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक शो)चे आयोजन करण्यात आले आहे. केवळ गॅजेटने चर्चेत राहणारा शो यंदा मात्र नव्या कोऱ्या कारमुळे लक्षवेधी ठरेल. या कारविषयी जगभरात कुतूहल आहे. कारच्या नव्या कन्सेप्ट समोर येतील. या फ्यूचर कार असतील. नवे तंत्रज्ञान व अद्ययावर फीचर्स यात आहेत. अशा कारविषयी...

- जनरल मोटर्स ऑल इलेक्ट्रिक शेवरले बोल्ट सादर करणार आहे. गेल्या वर्षी डेट्रॉयट ऑटो शोमध्ये कंपनीने ऑल इलेक्ट्रिक एसयूव्ही शेवरले बोल्ट कार सादर केली होती. सीईएसमध्ये कंपनी आपले प्रॉडक्शन मॉडेल सादर करणार आहे. प्रत्येक चार्जिंगनंतर कार २०० किलोमीटर धावते. याचे उत्पादन २०१७ पासून सुरू होणार आहे. ३८ हजार डॉलर्स किंमत असेल.
- फॉक्सवॅगन नवी कन्सेप्ट इलेक्ट्रिक व्हेइकल सादर करेल. ही प्रॉडक्शन कार नाही. अद्याप कंपनीने या मॉडेलविषयी अधिक माहिती दिली नाही. छायाचित्रावरून मायक्रोबस सादर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हिस्टॉरिक साम्बा बसप्रमाणे याचे मॉडेल आहे. नव्या कन्सेप्ट कारचे मॉडेल बुली कन्सेप्टवर आधारित आहे. कंपनीने २०११ च्या जिनिव्हा ऑटो शोमध्ये हे मॉडेल सादर केले होते.
- काही काळापूर्वी टोयोटाने डिजिटल मॅप्स सादर करण्याची घोषणा केली होती. सीईएसमध्ये डिजिटल मॅप सादर होतील. गुगलप्रमाणेच कंपनी डिजिटल मॅपिंग कारला रस्त्यांवर उतरवण्याऐवजी टोयोटा जीपीएस व कॅमेऱ्याचा वापर फ्यूचर प्रॉडक्शनसाठी करेल.
- ऑटोमोटिव्ह टेक कंपनी डेल्फीने ऑडीमध्ये लेटेस्ट सेल्फ - ड्रायव्हिंग टेक्नॉलॉजी सादर केली आहे. ऑडी एसक्यू५ मध्ये नवे तंत्रज्ञान सादर झाले आहे.
- फोर्ड जीटीमध्ये ग्रेट अॅरोडायनामिक्स आहेत. या सुपर कारमध्ये काही खास फीचर्स पाहण्यास मिळतील. स्लीक टू डोअर कुपे, बॉडी शेल इत्यादी. याची बनावट कार्बन फायबर व अॅल्युमिनियमने झाली आहे. ही वजनाने कमी, मात्र शक्तिशाली ट्विन-टर्बोचार्ज्ड इकोबुस्ट व्ही ६ इंजिनने समृद्ध आहे. इंजिन ६०० अश्वशक्ती देण्यास सक्षम. कमी वजनाच्या डिझाइनमुळे अॅरोडायनॅमिक्स इफिशियन्सी आहे. कारच्या ड्रॅगिंग समस्येतून सुटका होते. डाउनफोर्स व स्टेबिलिटी चांगली आहे.
- बीएमडब्ल्यूने नव्या व्हिजिन कारची घोषणा केली व टीझर सादर केले. यात कारच्या इंटेरिअर आणि ड्रायव्हरसोबत इंटरफेस स्पष्ट पाहता येतो. बीएमडब्ल्यू ने ७- सिरीजमध्ये जेश्चर कंट्रोल फीचर सादर केले. पुढील कारमध्ये कंपनी एअरटच फीचर देणार आहे. यात डॅशबोर्ड सेन्सर आहे.