आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या वर्षात कार महागणार; मारुतीसह सर्व कंपन्या करणार किमतीत वाढ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली- नव्या वर्षीत तुम्ही कार खरेदी करण्याचा विचार केला असेल तर हे वृत्त तुमच्यासाठी आहे. नव्या वर्षात कार महागणार आहेत. देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने नव्या वर्षांत कारच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मारुती सुझुकीने एक जानेवारी 2016 पासून आपल्या सर्व कारच्या किमतीत 20 हजार रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

जर्मन बनावटीच्या मर्सिडिज बेन्झने सर्वात आधी किंमत वाढीची घोषणा केली आहे. त्या पाठोपाठ बीएमडब्ल्यू, टोयोटा आदी आलिशान कारच्या स्पर्धक कंपन्याही नव्या वर्षात कार दरवाढ करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, ह्युंदाई मोटर इंडियाने तिची विविध वाहने 30 हजार रुपयांनी महाग होणार असल्याचे बुधवारीच स्पष्ट केले.

कार महागण्याचे कारण काय?
डॉलरच्या तुलनेत रुपयाची सातत्याने घसरण होत असल्याने कारच्या किमती वाढवण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे कार निर्मात्या कंपन्यांनी म्हटले आहे. पॅसेंजर कार, एसयूव्हीसह सर्व सेग्मेंटमधील कारच्या किमतीत एक ते तीन टक्के वाढ करण्‍यात येणार आहे.

कार महगण्यास हे फॅक्टर देखील जबाबदार...
- डॉलरच्या तुलनेत रुपयाचे होणारे अवमुल्यन
- कंपोनेंटच्या गुंतवणुकीत वाढ
- मॅन्‍युफॅक्‍चरिंग कॉस्‍टमध्ये वाढ
- मार्जिनमध्ये घट

या कंपन्यांनी केली दरवाढीची तयारी....
- टोयोटा कंपनी आपल्या वाहनांच्या दरात तीन टक्के वाढ करणार आहे.
- मर्सिडीज बेन्झने आपल्या वाहनांच्या दरात दोन टक्क्यांनी वाढ करणार आहे.
- बीएमडब्‍ल्‍यू व ऑडीने तीन टक्क्यांपर्यंत वाढ करण्‍याची घोषणा केली आहे.

31 डिसेंबरपर्यंत मिळतोय डिस्काउंट
डिसेंबर महिन्यांत जवळपास सर्वच वाहन निर्मात्या कंपन्या आपल्या उत्पादनावर मोठा डिस्‍काउंट देत आहे. मारुती सुझुकी अल्‍टोवर 25 हजार, सेलेरियोवर 15 हजार, वॅगनआर व अर्टिगावर 10-10 हजार रुपयांचा कॅश डिस्‍काउंट देत आहे.

दुसरीकडे, ह्युंदाईने देखील आपल्या अनेक मॉडलवर फ्री इंश्युरन्स व गिफ्ट चेकची ऑफर दिली आहे. ह्युंदाई ईऑनवर 25 हजार रुपयांचा गिफ्ट चेक, i10 वर 14 हजार, ग्रॅंड पर 8-10 हजार व एक्‍सेंटवर 5 ते 7500 रुपयांचा गिफ्ट चेक दिला जात आहे.


सहा महिन्यात दुसर्‍यांदा महागल्या कार...
वाहन निर्मात्या कंपन्यांनी मागील सहा महिन्यात दुसर्‍यांदा किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ऐरवी प्रतिवर्षी जानेवारीत वाहन निर्मात्या कंपन्या उत्पादनाच्या किमतीत वाढ करत असतात. दुसरीकडे, किंमत वाढीचा विक्रीवर कुठलाही परिणाम होणार नसल्याचे कंपन्यांनी म्हटले आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, कारच्या दरवाढीवर कार म्हणतात वाहन निर्मात्या कंपन्या...