आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डीएसके बेनेलीची १२ लाखांची बाइक, बेनेलीच्या पाच सुपरबाइक्स देणार बायकिंगचा थरार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - यंगिस्तानला बायकिंगचा नवा थरार देण्यासाठी डीएसके मोटोव्हील्स पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. बेनेली या इटलीमधील कंपनीबरोबरच्या सहकार्यातून पाच इटालियन सुपरबाइक्स बाजारपेठेत दाखल केल्या आहेत. हायएंड बायकिंगचा नवा अनुभव तरुणाईला या मोटारसायकलींमुळे मिळणार आहे.

देशातल्या सुपरबाइक उद्योगात कित्येक पटींनी वाढ झाली असून त्यामध्ये आणखी मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध आहेत. डीएसके- बेनेली बाइक्सच्या या नव्या श्रेणीमुळे देशातील बायकिंग उद्योगाचा चेहरा मोहरा बदलून जाईल, असा विश्वास डीएसके मोटोव्हील्सचे अध्यक्ष शिरीष कुलकर्णी यांनी व्यक्त केला.

एकशे चार वर्षांपेक्षा जुनी परंपरा आणि वारसा लाभलेली बेनेली हा सुपरबायकिंगमधील प्रख्यात इटालियन ब्रँड म्हणून ओळखला जातो. कंपनीच्या स्टायलिश मोटारसायकल कोणत्याही वयोगटातील रायडर्सला साजेल अशा आहेत. डीएसके मोटोव्हिल्सच्या या पाच नव्या सुपरबाइक्स ‘श्री आद्य कार कंपनी’च्या मुंबईतील वितरण केंद्राच्या उदघाटनप्रसंगी सादर करण्यात आल्या.

डीएसके मोटोव्हिल्स ही कंपनी बेनेलीच्या मोटारसायकलींची जुळवणी करून विक्री व सेवा तसेच सुटे भाग पुरवते. कंपनी पहिल्या टप्प्यात मुंबई, बंगळुरू, पुणे, अहमदाबाद, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता आणि गोवा वितरण केंद्र सुरू करणार आहे.

>बेनेलीने बाजारात आणल्या पाच बाइक
>टीएनटी आर (११३०) बाइकची किंत ११.८१ लाख
>३०० सीसीची टीएनटीची किमत २.८३ लाख
>टीएनटी ८९९ ची किमत ९.४८ लाख रुपये
>६०० सीसीच्या टीएनटी ६००-आयची किंमत ५.१५ लाख आणि टीएनटी ६०० जीटीची किंमत ५.६२ लाख रुपये