आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ducati Scrambler Official India Launch In May News In Marathi

भारतात मेमध्ये लॉन्च होईल ही SUPER BIKE, 803cc चे इंजिन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इटालियन बाइक मेकर कंपनी 'दुकाती'ची नवी सुपरबाइक 'स्क्रॅम्बलर' लवकरच भारतीय रस्त्यावर धावताना दिसेल. मे महिन्यात 'स्क्रॅम्बलर' लॉन्च करण्‍यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या दमदार बाइकला 803cc चे इंजिन आहे. स्क्रॅम्बलर ही 2015 वर्षातील सर्वात चर्चित बाइक असल्याचा दावा कंपनीच्या सूत्रांनी केला आहे. स्क्रॅम्बलर चार मॉडेल आणि पाच रंगातू उपलब्ध असेल.
दुकातीने सगळ्यात आधी 'मॉन्स्टर 795' बाइक भारतात उतरवली होती. परंतु, या बाइकला भारतीय ग्राहकांकडून अल्प प्रतिसाद मिळाला. स्क्रॅम्बलर बाइक काहीसी मॉन्स्टर सारखी दिसते.

नव्या बाइकची पॉवर 75 बीएचपी असून इंज‍िन 803cc आहे. इंजिनचे लेआउट एल-ट्विन, एअर कूल्ड, फोर-स्ट्रोक आहे. याता 6-स्पीड, 1-डाऊन, 5-अप गियर बॉक्स आहे. 13.5 लिटर क्षमतेची पेट्रोल टाकी. बाइकचे वजन 186 किलो आहे. उल्लेखनिय म्हणजे या बाइकमध्ये एग्जॉस्ट सिस्टम आहे. व्हीलबेस 1445 mm आहे.

Scrambler Icon
कलर: यलो अॅण्‍ड रेड
किंमत: 6.39 लाख (एक्स शोरूम, दिल्ली)

पुढील स्लाइडवर क्लिक करून जाणून घ्या, 'स्क्रॅम्बलर'चे अन्य मॉडेल आणि किंमत...