आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इलेक्ट्रिक कारचे स्वप्न साकारणार!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्कॉटलंडमधील संशोधक रॉबर्ट अँडरसन यांनी १८३२ ते १८३९ दरम्यान प्रायमरी सेलवर चालणारे घोडागाडीसारखे वाहन बनवले. हे सेल रिचार्ज करता येत नव्हते. याचदरम्यान अमेरिकेतील थॉमस डेव्हनपोर्ट यांनी विजेपासून चालणारे पहिले व्यावसायिक असे लोकोमोटिव्ह इंजिन तयार केले. मात्र, बॅटरी रिचार्ज करण्याची अडचण होती. यावर फ्रान्समधील भौतिकशास्त्रज्ञ गॅस्टन प्लांटे यांनी लेड- अॅसिड स्टोअरेज बॅटरीच्या शोधाने पर्याय मिळाला. याच देशातील कॅमिल फोरे यांनी १८५९ मध्ये त्यांच्या बॅटरीत सुधारणा करून सतत वीज देणारी लेड-अॅसिड बॅटरी तयार केली. ही बॅटरी अाजही वापरात आहे.
अमेरिकेत विल्यम मॉरिसन यांनी १८९१ मध्ये विजेपासून चालणारे पहिले वाहन तयार केले. त्यानंतर दोन वर्षांनी शिकागो येथे झालेल्या एका प्रदर्शनात वेगवेगळ्या कंपन्यांनी तयार केलेल्या विविध प्रकारच्या इलेक्ट्रिक कारचे सादरीकरण झाले. १८९७ मध्ये कनेक्टिकटच्या पोप मॅन्युफॅक्चरिंग कंपनीने न्यूयॉर्कच्या सडकेवर इलेक्ट्रिक टॅक्सी उतरवली. या घडामोडी बारकाईने पाहणाऱ्या थॉमस अल्वा एडिसन यांना अंदाज आला की, इलेक्ट्रिक कार हेच भविष्यातील वाहन असणार आहे. त्यांनी १८९९ मध्ये व्यावसायिक वाहनांसाठी लागणाऱ्या शक्तिशाली बॅटरीज तयार करण्याचे प्रयत्न सुरू केेले. त्यांच्या संशोधनात अाधीच्या बॅटरीत काही सुधारणा करण्यात आल्या. एका दशकाच्या संशोधनानंतर एडिसनने तो प्रयत्न सोडून दिला.

तोपर्यंत १९०० मध्ये इलेक्ट्रिक कारचा खूपच बोलबाला झाला होता. त्याच वर्षी अमेरिकेत तयार करण्यात आलेल्या ४१९२ कारपैकी २८ टक्के कार विजेवर चालणाऱ्या होत्या. न्यूयॉर्क, बोस्टन आणि शिकागोच्या रस्त्यावर जितक्या कार धावत होत्या त्यापैकी एक तृतीयांश इलेक्ट्रिक ऑटो होत्या.
१९०८ मध्ये हेनरी फोर्ड यांनी मास प्रॉडक्शन म्हणजे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी आॅनलाइन पद्धती सुरू करून पेट्रोलवर चालणाऱ्या टी माॅडेलच्या स्वस्त कार बाजारात आणून बदलच घडवला. १९१२ मध्ये चार्ल्स कॅटरिंग यांनी इलेक्ट्रिक ऑटोमोबाइल स्टार्टरचा शोध लावून हाताने हँडल फिरवून कार सुरू करण्याची कटकट संपवली आणि पेट्रोल कार आणखी आकर्षक केल्या. तेव्हाच इलेक्ट्रिक कारचा ध्यास संपुष्टात आला. १९२० मध्ये लांब पल्ल्याचा प्रवास करण्याची इच्छा, आखातात पेट्रोलचा शोध आणि शक्तिशाली बॅटरीच्या अभावामुळे विजेवर चालणाऱ्या कार अव्यवहार्य ठरवून त्या बाद ठरवण्यात आल्या.
पन्नास वर्षांपर्यंत विजेच्या कारचा विचार मागे पडला, परंतु १९७० मध्ये आखाती देशात तेल उत्पादनावर बंदी आणून तेलाच्या किमती वाढवण्यात आणि पर्यावरण प्रदूषणच्या वाढत्या चिंतेमुळे विजेच्या कारची निर्मिती करण्याची तयारी पुन्हा सुरू झाली. अमेरिकेत क्लीन कार इन्सेंटिव्ह प्रोग्राम पुन्हा लागू करण्यात आला. याअंतर्गत हायब्रिड कारचे गॉडफादर म्हटल्या जाणाऱ्या व्हिक्टर वॉक यांनी पहिली फूल पॉवरची फूल साइड हायब्रिड कार तयार केली. तथापि, चार वर्षांनंतर विजेच्या कारचा उपक्रम बंद करण्यात आला.

१९७४ मध्ये वेनगार्ड सॅबरिंगच्या सिटी कारची गती ताशी ३० मैलांवरून ताशी ४० मैल करून विजेवर चालणारी कार तयार करण्यात आली. ही कंपनी एका वर्षातच अमेरिकेतील सर्वात मोठी सहावी कारनिर्माता कंपनी ठरली. दोन वर्षांनंतर अमेरिकी काँग्रेसने विजेच्या कारच्या संशोधन आणि विकासासाठी नवे तंत्रज्ञान विकसित करता यावे म्हणून एका कायद्यास मंजुरी दिली. १९९७ मध्ये जपानच्या टोयोटा कंपनीने जगातील पहिली हायब्रिड कार तयार केली. पहिल्याच वर्षी १८ हजार कारची विक्री झाली. मग १९९७ ते २००० दरम्यान होंडा, जीएम, फोर्ड, निसान यासारख्या मोठ्या कार कंपन्यांनी इलेक्ट्रिक कार बाजारात आणल्या. परंतु बॅटरी लाइफ, गतीची अडचण, लांब पल्ल्यापर्यंत ती चालणे यात अडथळे येत गेले. त्यामुळे २००० मध्ये अशा कारचे उत्पादन बंद झाले. जनरल मोटर्सने ई-१ इलेक्ट्रिक कार कॅलिफोर्नियातील बरबँक प्लँटमध्ये फेबुवारी २००५ मध्ये नष्ट करण्याची योजना आखली. इलेक्ट्रिक कारच्या समर्थकांनी प्लँटला २८ तास घेराव घातला. तोपर्यंत जीएम कंपनीने तेथून या कार हलवल्या. २००६ मध्ये टेक्लाने सॅनफ्रान्सिस्को ऑटो शोमध्ये अल्ट्रा स्पोर्टी टेस्ला रोडस्टर सादरीकरण केले आणि विजेच्या कारबद्दल पुन्हा लोकांमध्ये आवड निर्माण झाली आहे.
टेस्लाच्या कारचे इतके आकर्षण कशामुळे?
विजेवर चालणाऱ्या कार खूप महाग असतात. तसेच पेट्रोलच्या तुलनेत त्या कमी वेगाने धावतात. टेस्लाच्या माॅडेल-३ मध्ये ही आव्हाने यशस्वीपणे पेलण्याचा प्रयत्न केला आहे.
एकदा चार्ज झाल्यानंतर ३४६ किमी अंतर कापणार मॉडेल थ्री
इलेक्ट्रिक कार मॉडेल थ्री बनवणाऱ्या टेस्लाला एका आठवड्यातच २ लाख ७६ हजार लोकांचे बुकिंग मिळाले आहे. यामुळे १० अब्ज डॉलर इतकी रक्कम कंपनीकडे जमा झाली आहे. या सलूनच्या बेसिक मॉडेलची किंमत ३५ हजार डॉलर इतकी आहे. याआधीच्या मॉडेलच्या तुलनेत ती निम्म्याहून कमी आहे; परंतु कर, नोंदणी आणि वितरण खर्च मिळून याची किंमत ४८ हजार डॉलरवर जाण्याची शक्यता आहे. ही कार इलेक्ट्रिक असूनही चालते खूप चांगली. ही कार जास्तीत जास्त ताशी २१० किमी इतक्या वेगाने धावते. ० ते १०० किमी ताशी वेग गाठण्यास फक्त सहा सेकंद लागतात. एकदा बॅटरी चार्ज केल्यानंतर ती ३४६ किमीपर्यंत धावते. कंपनीने २००८ नंतर फक्त १ लाख २५ हजार इलेक्ट्रिक कार विकल्या आहेत. या वेळी हा आकडा ५ लाखांचा टप्पा गाठेल अशी आशा आहे. ही कार २०१७ च्या शेवटी मिळण्याची शक्यता आहे. २२० व्होल्टचे फोनस्टाइल चार्जर आहे. मोठा चार्जर पॉइंटही शक्य आहे. मोठी जागा असेल तर सुपरचार्जर पॉइंट लावता येतो. बॅटरीला ८० टक्के चार्ज होण्यास ४० मिनिटे लागतात.
बॅटरी बदलणे महाग
नवी बॅटरी टाकण्यास किती खर्च येईल, हे टेस्लाने अद्याप जाहीर केलेले नाही. तथापि, टेस्लाच्या ग्लोबल वेबसाइटचा अंदाज अाहे की, बॅटरी बदलण्यास १२ हजार डॉलर इतका खर्च येईल. तो खूप जास्त वाटतो. आठ वर्षांत बॅटरीच्या किमती आणखी कमी होतील, असा कंपनीचा दावा आहे. जरी बॅटरीची क्षमता अद्याप जाहीर केलेली नसली तरी खर्चाचे गणित मांडणे अवघड आहे. किंमत कमी झाल्यावर ती खूप महाग असेल.
पर्यावरणाचा दावा पोकळ
अमेरिकेतील नॅशनल ब्युरो ऑफ इकॉनाॅमिक रिसर्चनुसार इलेक्ट्रिक कार पर्यावरणास घातक सिद्ध होऊ शकते. याची लिथियम आयन बॅटरी पर्यावरणासाठी हानिकारक आहे. यासाठी लागणाऱ्या रेअर अर्थ धातूसाठी जमिनीत खूप उत्खनन करावे लागते. तरीही हा धातू खूप कमी आढळून येतो. हा धातूही पर्यावरणास हानी पोहोचवणारा आहे.