आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ford Launches New Generation Figo With Price Range Of Rs 4 Lakh

Ford ने लॉन्च केली New Figo, 25 KMPL मायलेज, किंमत सव्वा चार लाख

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- Ford कंपनीने आपली बहुप्रतिक्षित कार न्यू जनरेशन Figo बाजारात उतरवली आहे. या कारची किंमत 4.29 लाख रुपये (एक्स शोरुम दिल्ली) आहे. पेट्रोल तसेच डिझेल व्हेरिएंटमध्ये ही कार उपलब्ध करून देण्यात आली आहे. पेट्रोल व्हेरिएंटचा 18.16 KMPL तर डिझेल व्हेरिएंटचा 25.83 KMPL चे मायलेज आहे.

एस्पायरप्रमाणे न्यू जनरेशन Figo मध्ये कंपनीने न्यू सिग्नेचर ग्रिलसोबत चार हॉरिझोंटल स्लेट्‍स, स्विफ्टबॅक हेड लाइट, अंडरलाइन बॉडी कलर बंपर आदी दिले आहे. इतकेच नव्हे तर Figoचे साइड प्रोफाइल एस्पायरप्रमाणे रियर व्हील आर्च आहे.
असे आहेत फीचर्स?
> कारमध्ये फस्ट इन क्लास 6 एयरबॅग्ज
>ड्युअल क्लच अॉटोमॅटीक ट्रान्समिशन
> पॉवरफूल इंजिन
> 1.5 लिटर TDCi यूनिट (99bhp) इंजिन (डिझेल व्हेरिएंट)
> 5 स्पीड मॅन्युअल गियरबॉक्स
> 2 पेट्रोल इंजिन- 1.2 लिटर TiVCT (87bhp), 5 स्पीड मॅन्युअल व 1.5 लिटर TiVCT (110bhp) व 6 स्पीड ड्युअल क्लच गियरबॉक्स.
> अंडरलाइन बॉडी कलर बंपर
मॉडेलनुसार किंमत: (एक्स शोरुम, दिल्ली)
पेट्रोल व्हेरिएंट
1.2 लिटर बेस- 4.29 लाख रुपये
1.2 लिटर एबिनएनेट- 4.56 लाख रुपये
1.2 लिटर ट्रेंड-5 लाख रुपये
1.2 लिटर ट्रेंड प्लस- 5.25 लाख रुपये
1.2 लिटर टायटे‍नियम-5.75 लाख रुपये
1.2 लिटर टायटे‍नियम प्लस- 6.40 लाख रुपये
1.2 लिटर (एटी) टायटे‍नियम- 6.91 लाख रुपये
डिझेल व्हेरिएंट
1.5 लिटर बेस- 5.29 लाख रुपये
1.5 लिटर एबिनएनेट- 5.62 लाख रुपये
1.5 लिटर ट्रेंड-5.97 लाख रुपये
1.5 लिटर ट्रेंड प्लस- 6.22 लाख रुपये
1.5 लिटर टायटे‍नियम-6.72 लाख रुपये
1.5 लिटर टायटे‍नियम प्लस- 7.40 लाख रुपये
मायलेज
1.2 लिटर Ti-VCT पेट्रोल- 18.16 KMPL
1.5 लिटर TiDCi डिझेल - 25.83 KMPL
मारुती स्विफ्टशी स्पर्धा...
न्यू जनरेशन फोर्ड फिगो थेट मारुती स्विफ्टशी स्पर्धा करण्याची शक्यता आहे. स्विफ्टची किंमत 4.64 लाख रुपये आहे. Figo हॅचबॅकची किंमत ही स्विफ्टच्या किमतीपेक्षा जवळपास 35 हजार रुपांनी कमी आहे.

पुढील स्लाइड्‍सवर पाहा, Ford ची नवी कार Figo चे फोटोज...