या आहेत 4 लो-मेन्टेनन्स कार, अशी होईल बचत
नवी दिल्ली- कार विकत घेताना बऱ्याच ग्राहकांना माहिती नसते की ते जी कार विकत घेत आहेत तिची मेन्टनन्स कॉस्ट किती असेल.
-
नवी दिल्ली- कार विकत घेताना बऱ्याच ग्राहकांना माहिती नसते की ते जी कार विकत घेत आहेत तिची मेन्टनन्स कॉस्ट किती असेल. कार विकत घेताना ही कॉस्टही विचारात घेणे आवश्यक असते. कार चालवणे आणि देशभाल करणे यात इंन्शुरन्स प्रिमियम, फ्यूल कॉस्ट, शेड्युल मेन्टेनन्स कॉस्ट आदींचा समावेश असतो. आज आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या कंपन्यांचे सर्व्हिस सेंटर, लेबर कॉस्ट याच्या आधारावर अशा कारची माहिती देणार आहोत ज्यांचा मेन्टेनन्स खर्च अत्यंत कमी आहे.
डिझेल, पेट्रोल कार मेन्टेनन्स कॉस्ट
ऑईल आणि फ्युअल फिल्टरची कॉस्ट पेट्रोल कारमध्ये डिझेल कारपेक्षा जास्त असते. बहुधा प्रत्येक १० हजार किलोमीटरवर ऑईल फिल्टर किंवा फ्युअल फिल्टर बदलावे लागते. त्याची कॉस्ट १,६०० ते १,७०० रुपये राहते. पेट्रोल कारमध्ये हीच किंमत ५५० रुपये असते.शेड्युल रिप्लेसमेंट
कुलेंट, एअर फिल्टर, फ्युअल फिल्टर आदींचे रिप्लेसमेंट करावे लागते. त्यांची कॉस्ट वेगवेगळी असते. या शिवाय लेबर कॉस्ट सुद्धा वेगवेगळी असते.पुढील स्लाईडवर वाचा, कोणत्या कार आहेत लो- मेन्टेनन्स कार....
-
फोर्ड एस्पायर
फोर्ड इंडियाने दावा केला आहे, की एस्पायरची मेन्टेनन्स कॉस्ट अत्यंत कमी आहे. एस्पायरच्या पेट्रोल व्हेरायंटची सर्व्हिस कॉस्ट पाच वर्षांनीही ३११९ रुपयांपर्यंत असते. कंपनीच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, १ वर्ष किंवा १० हजार किलोमीटरची सर्व्हिस कॉस्ट १३८१ रुपये, ३ वर्षे किंवा ३० हजार किलोमीटरची सर्व्हिस कॉस्ट ३११४ रुपये आहे. -
टोयोटा लिवा
टोयोटा कार मेन्टेनन्ससाठी फार किफायती असतात. टोयोटाच्या बहुतांश कार १.५ लाख किलोमीटरपर्यंत कुलेंट रिप्लेसमेंट आणि ट्रान्समिशन ऑईल चेन्ज याची गरज भासत नाही. फ्युअल फिल्टर मात्र ८९ हजार किलोमीटर झाले की बदलावे लागते. टोयोटा लिवात ४० हजार किलोमीटरनंतर एअर फिल्टर आणि ब्रेक फ्युअल रिप्लेसमेंट करावे लागते. त्याची कॉस्ट ८०० रुपये आहे. या शिवाय इंजिन ऑईल, ऑईल फिल्टर आणि स्पार्क प्लग रिप्लेस करायला ३५०० ते ४००० रुपये खर्च येतो. -
सेलेरियो
मारुती सुझुकीची सेलेरियो खुप पॉप्युलर कार आहे. या कारला १.० लीटर पेट्रोल व्यतिरिक्त ऑटोमॅटिक व्हेरायंटमध्ये सादर करण्यात आले आहे. याच्या पेट्रोल व्हेरायंटची साधारणपणे सर्व्हिस कॉस्ट सहा वर्षांसाठी १५ हजार रुपये राहते. -
हुंदाई ग्रांड आय १०
हुंदाई इंडियाची ग्रांड आय १० ही कंपनीची सर्वाधिक विकली जाणारी कार आहे. सर्व्हिसिंग शेड्युल २००० किमी किंवा २ महिने, १० हजार किमी किंवा १ वर्षे, २० हजार किमी किंवा २४ महिने आहे. याची पहिली सर्व्हिसिंग फ्री मिळते. या नंतर प्रत्येक सर्व्हिसिंगला २५०० रुपये खर्च येतो.