आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • General Motors Invest 6,500 Crores In Maharashtra

गुजरातचा ६,४०० कोटींचा व्यवसाय महाराष्ट्रात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गुजरातमधील हालोल येथे जनरल मोटर्स मोठी गुंतवणूक करून आपला प्रकल्प उभारणार होते; मात्र महाराष्ट्राने गुजरातचा हा प्रकल्प आपल्या खिशात घातला असून आता जनरल मोटर्सने तळेगाव येथील आपल्या प्रकल्पातच ६,४०० कोटी रुपयांची अतिरिक्त गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी महाराष्ट्र शासन आणि जनरल मोटर्स यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विधान भवन येथे सामंजस्य करार करण्यात आला.

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले की, राज्यातील गुंतवणूक शेजारी राज्यांमध्ये जात असल्याचा प्रचार काही जण करत होते. परंतु आम्ही असा अपप्रचार करणा-यांना हा करार करून उत्तर दिले आहे. गुजरातमधील प्रकल्प राज्याने आपल्या खिशात टाकला आहे. जनरल मोटर्स कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेरी बॅरा यांनी भारत आणि सिंगापूरच्या वरिष्ठ अधिका-यांच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांची आणि माझी भेट घेतली. जनरल मोटर्स आता मेक इन महाराष्ट्रअंतर्गत गाड्या तयार करणार असून त्या निर्यातही केल्या जाणार आहेत. कंपनीची तळेगाव येथील वाहननिर्मितीची क्षमता एक लाख ७० हजार गाड्या एवढी आहे. अतिरिक्त गुंतवणूक करून कंपनी बीट, सेल आणि स्पार्क गाड्यांची निर्मिती करणार आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध होणार असून गाड्यांच्या निर्मितीत राज्य अग्रेसर होईल, अशी आशाही उद्योगमंत्र्यांनी व्यक्त केली.