आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: गूगलची चालकविरहित कार धावली सिलिकॉन व्हॅलीतील रस्त्यावर...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गूगलची चालकविरहित कार सिलिकॉन व्हॅलीतील रस्त्यावर धावताना दिसत आहेत... - Divya Marathi
गूगलची चालकविरहित कार सिलिकॉन व्हॅलीतील रस्त्यावर धावताना दिसत आहेत...
सन फ्रान्सिस्को- अमेरिकेतील शहर सन फ्रान्सिस्को स्थित गूगलच्या हेडक्वार्टरच्या जवळील रस्त्यावर कंपनीचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट सेल्फ ड्रायविंग कार ( चालकशिवाय चालणारी कार) ची टेस्ट सुरु झाली आहे. गूगलच्या या दोन सीटर कारला सामान्य रस्त्यावर धावण्यासाठी आता प्रथमच परवानगी देण्यात आली आहे. याआधी ही कार शहरातील 120 किमी दूर एयरफोर्सवरील एका बेसवरील प्रायवेट ट्रॅकवर या कारची टेस्ट घेण्यात येत होती. एक वर्षापूर्वीच गूगलने या प्रोजेक्ट लोकांच्या समोर ठेवला होता.
काय आहे उद्देश-

कॅलिफोर्नियातील मोटर व्हेईकल डिपार्टमेंटने गूगलला सुरवातीला 25 कार रस्त्यावर उतरविण्यासाठी परवानगी दिली आहे. तासी 25 किलोमीटर धावणा-या या कार कॅलिफोर्नियातील माउंटेन व्यू भागात दिसून आल्या. कारच्या या नव्या मॉडेलमध्ये ना स्टिअरिंग व्हील आहे ना ब्रेक पॅडल. मात्र, सार्वजनिक रस्त्यावर धावताना हे घटक कारमध्ये राहतील. तसेच रन टेस्टदरम्यान या कारमध्ये चालकही असेल कारण काही आपत्कालीन स्थितीत लागलीच नियंत्रण करता यावे यासाठी. या टेस्ट द्वारे गूगल कंपनी जाणून घेणार आहे की, चालकविरहित कार इतर सामान्य चालक कारच्या तुलनेत कशी काम करते व धावते हे तपासून पाहणार आहे.
2020 पर्यंत रस्त्यावर-

सर्व काही सोपस्कर पार पडले तर गूगलची काही चालकविरहित कार 2020 पर्यंत बाजारात येण्याची शक्यता आहे. याचबरोबर कंपनी स्टिअरिंग व्हील, ब्रेक पॅडल आणि आपत्कालीन चालक यांच्याशिवाय कार धावण्यासाठी परवानगी मिळवेल.
याआधी घडली आहे दुर्घटना-

गूगलच्या माहितीनुसार, त्यांची सेल्फ ड्रायविंग कारच्या सुरुवातीच्या मॉडेल्स 18 लाख किमीच्या टेस्टिंगच्या दरम्यान 13 किरकोळ अपघाताला बळी पडली होती. गूगलने या दुर्घटनांना टेस्टिंग ट्रॅकवरील इतर कारना यासाठी जबाबदार धरले होते. मात्र, अपघाताच्या दरम्यान कंपनीचा एक कर्मचारी होता हे कंपनीने मान्य केले आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, गूगलच्या सेल्फ ड्रायविंग कारची काही संग्रहित फोटोज...
बातम्या आणखी आहेत...