आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वयंचलित गुगल कार धावणार अमेरिकेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ह्यूस्टन - ज्या वाहनाला चालकच नाही, तरी आपल्या इच्छित स्थळी ते सुरक्षितपणे पोहाेचवेल अशा कारचे स्वप्न गुगलने जगाला दाखवले.. आता येत्या पंधरवड्यात यापैकी ५० कार अमेरिकेतील गुळगुळीत रस्त्यांवर धावताना दिसतील. कार स्वयंचलित असल्या तरी सध्या यात सुरक्षा चालक असतील. रॉश इंडस्ट्रीजने या कारची बांधणी केली असून सन २०१० पासून गुगल कंपनी या प्रकल्पावर काम करत आहे. लेक्सस आरएक्स ४५० एच स्पोर्ट युटिलिटी व्हेइकलचेच सॉफ्टवेअर रॉश इंडस्ट्रीने या कारमध्ये वापरले आहे.

संकेतस्थळावर माहिती
कारच्या चाचण्यांची माहिती देणारे संकेतस्थळ गुगल विकसित करत आहे. कारच्या विकासाचे सर्व टप्पे आणि रस्त्यांवर होणार्‍या चाचण्यांचे सर्व तपशील त्यावर मिळतील. ते दररोज अपडेट केले जाईल.

आधुनिक आवृत्ती
- संगणकावरच नियंत्रणाची जबाबदारी असल्याने कारमध्ये कायमस्वरूपी स्टिअरिंग किंवा पॅडल्स नाहीत.
- मात्र आणीबाणीच्या परिस्थितीत तात्पुरत्या उपाययोजनेतून कार चालवताही येईल.
- पूर्वीच्या मॉडेलमध्ये ब्रेक्स पॅडल, लाइट, रिमूव्हेबल अ‍ॅक्सिलरेटर पॅडल व स्टिअरिंग नव्हते.
पुढे वाचा, GenX : नॅनो नव्या रूपात....
बातम्या आणखी आहेत...