आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - दिल्लीमध्ये वाढत्या प्रदूषणामुळे 2 वर्षे आधीच म्हणजे एप्रिल पासूनच BS-VI नॉर्म्स लागू केले जाणार आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने ही घोषणा केली आहे. आधी हे नॉर्म्स एप्रिल 2020 पासून लागू करण्याचे नियोजन होते.
ऑइल कंपन्यांना तयारी करण्याचे निर्देश
- पेट्रोलियम मंत्रालयाने एका वक्तव्यामध्ये म्हटले की, दिल्ली आणि त्याला लागून असलेल्या परिसरामध्ये प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ते पाहता सरकारी ऑइल मार्केटींग कंपन्या (ओएमसी) इंडियन ऑइल कॉर्प लिमिटेड, भारत पेट्रोलियम कॉर्प लि., हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्प लिमिटेड बरोबर चर्चा केल्यानंतर दिल्लीमध्ये नियोजित वेळेआधी BS-VI नॉर्म्स लागू करण्याची घोषणा केली आहे.
- त्यासाठी ऑइल कंन्यांकडून संपूर्ण एनसीआरमध्ये 1 एप्रिलपासून BS-VI इंधन सुरू करण्यास सांगण्यात आले आहे.
- राजदानी आणि त्याच्या आसपासच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून प्रदूषण धोक्याच्या पातळीच्या पुढे सरकले आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
BS-IV वरून थेट BS-VI नॉर्म्स लागू होणार
काही वेळापूर्वी पेट्रोलियम मिनिस्ट्रीने 2020 पासून BS-VI नॉर्म्स लागू करण्याची घोषणा केली होती. BS-VI नॉर्म्सच्या पेट्रोल आणि डिझेलमध्ये कमी नायट्रोजन ऑक्साइड आणि असे तत्व असतील जे सध्या BS-IV फ्यूलमध्ये असतात.
मोठी गुंतवणूक करत आहेत ऑइल कंपन्या
- देशात BS-VI नॉर्म्स लागू करण्यासाठी सरकारी ऑइल कंपन्या बरीच तयारी करत आहेत.
- या कंपन्या BS-VI कम्प्लायन्ट फ्यूल प्रोडक्शनसाठी अपग्रेडेशनवर 30 हजार कोटींची गुंतवणूक करत आहेत.
- ऑइल कंपन्या आणि ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सच्या अधिकाऱ्यांच्या मते जुन्या गाड्यांना BS-VI इंधनाने काहीही अडचण येणार नाही, पण त्याने इंजिनची एफिशियन्सी कमी होऊ शकते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.