आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बजाज बाईक्सवर 4500 पर्यंतची सूट, GST चा लाभ तत्काळ देणार असल्याची घोषणा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - बजाज ऑटो कंपनीने आपल्या टू व्हीलर वाहनांच्या किमतींमध्ये 4500 रुपये पर्यंतची भरघोस सूट जाहीर केली. ही सूट तत्काळ लागू केली जाणार आहे. GST चा फायदा लवकरात लवकर ग्राहकांना मिळवून देणे हा आपला हेतू असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. 
 
 
- बजाज ऑटोने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या बाईक्सची सुरुवाती किंमत 35,183 रुपये (CT -100) आहे. तर टॉप बाईक मॉडेलची (डॉमिनर -400) किंमत 1.53 लाख रुपये एवढी आहे. 
 
- ह्या किमती दिल्ली एक्स शोरूमनुसार आहेत. कंपनीच्या बाईक्स खरेदी केल्यास ग्राहकांना 4500 रुपयांपर्यंत वाचवता येणार आहेत. 
 
 
32 टक्के कर ऐवजी आता केवळ 28 टक्के
बजाज ऑटोचे प्रेसिडेंट (टू-व्हीलर) एरिक वास यांनी सांगितले, की जीएसटी लागू होण्याची वेळ जवळ आली आहे. यानंतर बाईकवर लागणारा कर कमी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर ग्राहकांना लवकरात लवकर फायदा मिळवून देण्याच्या हेतूने कंपनीने हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी बहुतांश टू व्हीलर खरेदीवर 32 टक्के कर लागत होता. आता देशात सर्वत्र बाईक खरेदीवर 28 टक्के कर लावला जाणार आहे. यात महत्वाचे म्हणजे, 350 सीसी पेक्षा अधिक क्षमतेची बाईक असल्यास त्यावर 3 टक्के अतिरिक्त कर लागणार आहे.
 
बातम्या आणखी आहेत...