नवी दिल्ली - सुमारे चार वर्षांपूर्वी वेगळे होणारी हीरो मोटोकॉर्प आणि जपानची
होंडा पुन्हा आमने-सामने आल्या आहेत. हिरोने मात्र
आपली नवी बाईक स्प्लेंडर आयस्मार्टसाठी १०२.५ किलोमीटर प्रतिलिटर मायलेज असल्याचा दावा केला आहे. परंतु हा दावा खोटा आहे. कारण गाडीचे इंजिन आम्ही तयार केले आहे. त्यामुळे मायलेजचा दावा वास्तवापासून खूप दूर असल्याचे होंडाने म्हटले आहे.
हीरो कंपनीने होंडाचा आक्षेप निरर्थक असल्याचे सांगून मायलेजला आंतरराष्ट्रीय सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नाॅलॉजी (आयकॅट) कडून प्रमाणित करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहेत. ही संस्था सरकारची अधिकृत संस्था आहे. होंडा दावा म्हणजे कायद्याला सरळ आव्हान दिले आहे. आयकॅटच्या प्रमाणपत्राला आव्हान देणे याचा अर्थ भारत सरकारच्या मापदंड आणि नियमांवर प्रश्न निर्माण करण्यासारखे आहे, असे हीरो कंपनीने म्हटले आहे. दुसरीकडे आयकॅट ही प्रतिष्ठित संस्था आहे. परंतु निर्मात्याचा दावा वास्तवाला धरून असावा. ही जबाबदारी निर्मात्याची आहे. इंजिन आम्ही तयार केले आहे. मायलेजला आम्ही अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो, असे होंडा रिसर्चच्या सीईआे कासा यांनी सांगितले.