आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Auto: ग्राउंड क्लिअरन्स अधिक, तरीही जबरदस्त वेग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टाटाच्या नव्या क्रॉसआेव्हर हेक्सा आणि टोयाेटा फॉर्च्युनरला स्पर्धा निर्माण करणा-या शेव्हरले ट्रेलब्रेजरविषयी...


>शेव्हरलेची नवी ट्रेलब्रेजर २.८ ४ डब्ल्यूडी कार आहे. नवी कार ४ सिलिंडर, २७७६ सीसी, डायरेक्ट इंजेक्शन, टर्बो डिझेल इंजिनने समृद्ध आहे. ६-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आहे. लांबी/रुंदी/उंची ४८७८ एमएम/१९०२ एमएम/१८४७ एमएम आहे. ग्राउंड क्लिअरन्स २३१ एमएम असून फ्युएल टँक क्षमता ७६ लिटर आहे.
>कारचा रॅप-अराउंड रिअर टोयोटा फॉर्च्युनर कारसारखा आहे. मात्र, जास्त क्लॅडिंग नसल्याने ही एसयूव्ही थोडी वेगळी आहे. विशेषत: व्हील आर्चिज. त्यामुळे कारसारखा सॉफ्ट टच मिळतो. कारचा फर्स्ट लूक प्रभावित करणारा आहे. टोयोटा फॉर्च्युनरच्या तुलनेत याचे इंजिन छोटे आहे. याचा पंच व रिस्पॉन्स चांगला आहे.
>कारचे इंटेरिअर अपस्केल आहे . जागा एेसपैस आहे. दुस-या व तिस-या लाइनमध्ये सामान ठेवण्यासाठी भरपूर जागा दिली आहे. या दोन लाइन्सला सहज फोल्ड करता येते. डार्क अॅश ग्रे रंगातही इंटेरियर उपलब्ध आहे. इन्स्ट्रुमेंटचे डिझाइन स्पोर्टी कॅमरों कारसारखे आहे.
>यात प्रोजेक्ट हेडलाइट आहे. त्यामुळे दूरपर्यंतचे दृश्य सहज दिसते. अॅटजेस्टेबल स्विच असल्याने चालकाला सेटिंग करणे सोपे जाते. फॉग हेडलँपने व्हिजन वाढते. धुके वा पावसात गाडी चालवणे सोपे जाते. एलईडी रिअर लँप फीचर खूप फायद्याचा आहे. यामुळे कोठे थांबायचे हे चालकाला कळते.
>ट्रेलब्रेजरमध्ये अत्याधुनिक फोर-व्हील डिस्क ब्रेक सिस्टिम लावण्यात आली आहे. यामुळे जास्त सुरक्षित वाटते. याशिवाय अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिम, इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रिब्युशन, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टिम, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, पॅनिक ब्रेक असिस्ट, कार्निरिंग ब्रेक कंट्रोल, हायड्रॉलिक ब्रेक असिस्ट आणि हायड्रॉलिक ब्रेक फेड असिस्ट, हिल डिसेंट कंट्रोल आणि हिल स्टार्ट असिस्ट असे सुरक्षेसाठीचे फीचर्स यात आहेत.
>हाय ग्राउंड क्लिअरन्स असूनही वेग व स्टेबिलिटी जबरदस्त आहे. पुढच्या सीटचा आकार मोठा आहे. साइड बॉलस्टरिंग जास्त आहे. इतर सात सीटवर कोणी बसले असले तरीही सामान ठेवण्यास जागा आहे.

पुढे वाचा, एसयूव्हीचा नवा ट्रेंड आणणार टाटा क्रॉसआेव्हर
बातम्या आणखी आहेत...