आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होंडा सीबीआर ६५० एफचा भारतीय बाजारात दाखल प्रवेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - होंडाची "मेक इन इंडिया' टूअर मोटसायकल्सपैकी पहिली ६५० सीसी मध्यम वजनाची स्पोर्टस मॉडेल मोटारसायकल भारतीय बाजारात दाखल झाले आहे. अत्यंत सडपातळ व स्पोर्टी असून त्यात १६ व्हॉल्व्ह डीओएचसी इन लाइन ४ सिलिंडर्स, ६ गिअरबॉक्स इंजिन आहे. प्रवासी तसेच स्पोर्ट चालकांबरोबरच विविध प्रकारच्या वापरकर्त्यांना ही गाडी आवडेल असा दावा कंपनीच्या वतीने करण्यात आला आहे. या काडीची ब्रँड अॅम्बेसेडर अभिनेत्री तापसी पन्नू हिने सीबीआर २५० आर चालवून लिंगभेदाला आव्हान दिले आहे. ती म्हणाली की, ही गाडी चालवण्याचा अानंद अनुभवता येतो, शब्दांत सांगता येत नाही. मी होंडाची चालक आणि चाहती असल्याचे तिने सांगितले.

मोटोजीपी असोसिएशनशी भागीदारी : आपली आंतरराष्ट्रीय स्तरावरील भागीदारी भारतात आणताना होंडाने घोषणा केली की, त्यांनी प्रतिष्ठित इटालियन डेनिम ब्रँड गॅसशी भागीदारी केली आहे. अधिकृत स्टाइल भागीदार म्ळणून गॅसने रेव्हफेस्टच्या व्यासपीठावर (दिल्ली, मुंबई आणि बंगळुरू) तीन शहरांमध्ये अॉटम/विंटर २०१५-१६ कलेक्शन दाखवले. त्यांसाठी त्यांनी एका छोट्या फॅशन शोचे आयोजन केले होते. ज्यात होंडा ब्रँड अॅम्बेसेडर आणि बाॅलीवूडचे अॅक्शन किंग अक्षय कुमार हे शो स्टॉपर उपस्थित होते. आम्हाला गॅससोबत भागीदारी करताना खूप आनंद होत असल्याचे होंडाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी केता मुरामात्सू यांनी या वेळी बाेलताना सांगितले.