आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हायड्रोजन इंधनावर धावणारा ट्रक, केवळ US लष्कर वापरणार, उंची 6.5 फुट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- जनरल मोटर्सने अमेरिकेच्या लष्करासाठी हायड्रोजन इंधणावर धावणारा दमदार ट्रक तयार केला आहे. अमेरिकी लष्कराच्या टॅंक ऑटोमोटिव्ह रिसर्च, डेव्हलपमेंट आणि इंजिनिअरिंग सेंटरने शेवरोले या कंपनीसोबत मिळून हा ट्रक तयार केला आहे. आतापर्यंत तयार करण्यात आलेला हा सर्वांत मजबूत पिकअप ट्रक आहे.
कोणत्याही प्रकारच्या रोडवर धावू शकतो हा ट्रक
6.5 फुट उंची असलेला हा ट्रक 7 फुट रुंदीचा आहे. याचे वजन सुमारे 2700 किलो किलो आहे. यात डिझेल किंवा पेट्रोल नव्हे तर चक्क हायड्रोजन वापरले जाते. त्यासाठी फ्लुअल सेल लावण्यात आले आहेत. ZH2 पॉवर हे सेल जनरेल करतात. याचे इंजिन 174 हॉर्स पॉवरचे असून एकाच मोटरने चारही चाकांवर समान दाब टाकते. या ट्रकला आणखी पॉवरफुल आणि स्मुथ करण्यासाठी प्रत्येक चाकाला स्वतंत्र इंजिन लावण्यावरही कंपनी विचार करत आहे. इलेक्ट्रिक पॉवरचाही या ट्रकमध्ये वापर होतो. डिझेल किंवा पेट्रोलच्या ट्रकपेक्षा गतीने धावण्यासाठी ट्रकला मदत होते.
पुढील स्लाईडवर बघा, या दमदार ट्रकचे आणखी शानदार फोटो....
बातम्या आणखी आहेत...