आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा येत आहे Hyundai ची पहिली कार; किंमत इतकी कमी की, विश्वासच बसणार नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑटो डेस्क- मार्केटमधून बाहेर पडलेली Hyundai ची पहिली कार Santro एकेकाळी तुमचीही ड्रीम कार असेल. Santro कार खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न अपूर्ण राहिले असेल तर, ही न्यूज तुमच्या कामाची आहे. Hyundai लवकरच आपली All New Santro मार्केटमध्ये उतरवणार आहे.

3.5 लाख रुपयांत मिळेल ही स्टाइलिश हॅचबॅक...
बाजारातील इतर कंपन्यांच्या कारच्या तुलनेत All New Santroची किंमत कमी आहे. Santro कार केवळ 3.5 ते 5 लाख रुपयांच्या बजेटमध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. 

'Santro 2018 AH' या कोडनेमने न्यू कार सादर करण्‍यात येणार आहे. कंपनी यासोबत आपली दुसरी स्टाइलिश हॅचबॅक i10 ला रिप्लेस करणार आहे. या कारमध्ये Old Santro चा लूक नव्या स्टाईलमध्ये देण्यात येणार आहे.

न्यू कारचे डोर वेगळ्या पॅटर्नमध्ये असतील. सोबतच स्पेसिफिकेशन, फीचर्स आणि मायलेजच्या बाबतीत ही कार शानदार असेल. 

कारमध्ये 1.0 लिटरचे हायली रिफाइंड पेट्रोल इंजिन बसवण्यात येणार आहे. कारच्या इंजिनमध्ये 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आले आहे. सोबत AMT चा पर्याय उपलब्ध असेल.

दरम्यान, भारतात Hyundai ने यशस्वी 20 वर्षे पूर्ण केल्यानिमित्त कंपनीने ही कार लॉन्च करणार आहे. कोरियाच्या या कंपनीने 1998 मध्ये आपली पहिली कार Santro बाजारात लॉन्च केली होती.

पुढील स्लाइडवर वाचा, Hyundai ची स्टाइलिश कार Santro 2018 AH चे Photos...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)