आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

8.59 लाखांमध्ये HYUNDAI ने आणली एसयुव्ही CRETA, जाणून घ्या फिचर्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- कोरियन कार मेकर HYUNDAI ने आज (मंगळवार) एसयुव्ही क्रेटा लॉंच केली. हिची एक्स शोरुम किंमत (दिल्ली) 8 लाख 59 हजार रुपये आहे. टॉप मॉडेलची किंमत 11.19 लाख रुपये आहे. डिझेल मॉडेलची किंमत 9.46 लाखांपासून 13.6 लाख रुपयांपर्यंत आहे. या कंपनीने पहिल्यांदाच एखाद्या कारचे ग्लोबल लॉंचिंग इंडियात केले आहे. लॉंच करण्याच्या एका दिवसापूर्वी कंपनीने कारचे फिचर्स जाहीर केले होते.
तीन इंजिन व्हेरायंट राहणार- 1.4 लिटर सीआरडीआय डिझेल, 1.6 लिटर सीआरडीआय वीजीटी डिझेल आणि 1.6 वीटीवीटी पेट्रोल.
6 मॉडलसोबत 11 व्हेरायंट- कंपनी क्रेटाला बेस, एस एस प्लस, एस एक्स, एस एक्स प्लस, एसएक्स (ऑप्शनल) सारख्या 6 ट्रिम लेव्हलसोबत 11 व्हेरायंटमध्ये लॉंच करणार आहे.
पहिल्यांदाच ऑटोमॅटिक ट्रान्समिशन- 1.6 लिटर सीआरडीआय वीजीटी इंजिन व्हेरायंटमध्ये ऑटोमॅटिक ट्रान्समिशनची सुविधा आहे. या कॅटेगरीत ही सुविधा पहिल्यांदाच दिली जात असल्याचे कंपनीने सांगितले आहे.
सात कलर ऑप्‍शन्स- रेड, व्हाइट, सिल्व्हर, ब्लॅक, ग्रेसह सात कलरमध्ये बाजारात आणत आहे.
क्रिएटमधून आले क्रेटाचे नाव
क्रेटाची स्पर्धा मारुतीची एस क्रॉस, रेनो डस्टर आणि फोर्ड इकोस्पोट्ससोबत आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, क्रेटाचा स्टायलिश लुक... सेफ्टी फिचर्स... आणि इतर कारसोबत कम्पॅरिजन...
बातम्या आणखी आहेत...