आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hyundai Launches The All New 4S Fluidic Verna The World Sedan News In Marathi

Hyundai ने लॉन्च केली VERNA चे Fluidic व्हर्जन, किंमत 7 लाख रुपये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोः दिल्लीत लॉन्च झालेली VERNA New 4S Fluidic)

नवी दिल्‍ली- ह्युंदाई मोटर इंडियाने आपली सेडान सेगमेंट कार Verna चे अपडेटेड व्हर्जन Fluidic 4S लॉन्च केले आहे. Fluidic 4S ची दिल्‍ली एक्स शोरूम किंमत 7.74 लाखपासून ते 12.19 लाख रुपयेदरम्यान आहे. ह्युंदाईचे नवे मॉडेल होंडा सिटी आणि मारुती सियाजसोबत स्पर्धा करण्‍याची शक्यता नाकारता येत नाही.
Fluidic 4S हे मॉडेल पेट्रोल तसेच डिझेल अशा दोन्ही व्हर्जनमध्ये लॉन्च करण्यात आले आहे. ह्युंदाई कंपनीने Verna चे आतापर्यंत 23 लाख यूनिट विक्री केले आहेत.
काय आहेत न्यू फीचर्स...
New Verna Fluidic 4S मध्ये फक्त कॉस्मॅटिक बदल करण्‍यात आले आहेत. कॉस्मॅटिक बदलमध्ये हेडलॅंप, फॉगलॅंप आरि स्मायलिंग फेस वाली फ्रंट ग्रिल बसवण्यात आली आहे. इंजिनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसला तरी बॉडीला क्लासिक आणि मॉर्डन असा लूक देण्यात आला आहे.
ह्युंदाई कंपनीने 2011 मध्ये Verna कार लॉन्च केली होती. नंतर 2013 मध्ये कंपनीने सस्पेंशनमध्ये बदल करून Verna चे रिलॉंचिंग केले होते. रिअर पॅसेंजरसाठी आरमदायी व्हावे, यासाठी को-पॅसेंजर सिटला अॅडजस्ट करु शकेल अशी व्यवस्था करण्‍यात आली आहे.

पुढील स्लाइड्‍सवर पाहा, Hyundaiच्या VERNA New 4S Fluidicचे फीचर्स आ‍णि फोटो...