आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Among Engineers Who Detect Volkswagen Emission Cheat. News In Marathi

\'फोक्सवॅगन\'ची लबाडी चव्हाट्यावर, भांडाफोड करणार्‍यांमध्ये भारतीय इंजीनियर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- जर्मन कार मेकर 'फोक्सवॅगन' कंपनीची लबाडी चव्हाट्यावर आली आहे. अमेरिकन पर्यावरण संरक्षण संस्थेने केलेल्या तपासणीत 'फोक्सवॅगन'ने दिशाभूल केल्याची माहिती समोर आली आहे. 'फोक्सवॅगन'ने एका सॉफ्टवेअरच्या आधारे एक कोटी 10 लाख डिझेल कारमध्ये इमिशन टेस्टिंगमध्ये फेरफार (प्रदूषणाची मात्रा) केल्याचे स्पष्ट झाले आहे.

'फोक्सवॅगन'च्या या प्रतापामुळे पर्यावरणाला मोठी हानी पोहोचल्याचे पर्यावरण संरक्षण संस्थेने म्हटले आहे.कंपनीला अब्जावधी डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला आहे. ही रक्कम भारतीय चलनात 1150 अब्ज रुपये आहे. दुसरीकडे, कंपनीने मंगळवारी आपली चूक कबूल केली आहे.
परिणामी कोरियासारख्या इतर देशांनीही फोक्सवॅगन कारची तपासणी सुरु केली आहे. मागील सात वर्षांत या सर्व गाड्याची निर्मिती झाली होती.

विशेष म्हणजे 'फोक्सवॅगन'ची लबाडी चव्हाट्यावर आणण्यात भारतीय मॅकॅनिकल इंजीनियर अरविंद थिरूवेंगडम यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

फोक्सवॅगनने एका सॉफ्टवेअरच्या आधारे इमिशन टेस्टिंगमध्ये फेरफार करून प्रदूषणाची मात्रा कमी दर्शवली होती. झेटा, बीटल, पसाट, गोल्फ आणि ऑडी ए3 सारख्या गाड्यांमध्येही हे सॉफ्टवेअर वापरण्यात आले होते. प्रत्यक्षात या गाड्या मोठ्या प्रमाणात प्रदूषण करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कंपनीला अमेरिकेतील आपल्या पाच लाख कार परत बोलवाव्या लागणार आहेत.

'फोक्सवॅगन'चे शेअर्स 20 टक्क्यांनी घसरण
'फोक्सवॅगन'ने लबाडी केल्याचे जगासमोर आल्यानंतर कंपनीची शेअर्स 20 टक्क्यांनी घसरले आहेत. त्याचा परिणामही युरोप आणि आशियातील शेअर बाजारांतही दिसत आहे.