Home | Business | Auto | cars launch in india october 2017

दिवाळीपूर्वी लाँच होणार या 5 SUV कार, फक्त 20 हजारांत करा बुकींग

दिव्य मराठी वेब टीम | Update - Oct 02, 2017, 12:03 AM IST

नवी दिल्ली - चालू वर्ष हे ऑटोमोबाईल उद्योगाला संमिश्र राहिले. जीएसटी लागू होण्यापूर्वी कंपन्यांनी कारच्या किंमती कमी केल

 • cars launch in india october 2017
  नवी दिल्ली - चालू वर्ष हे ऑटोमोबाईल उद्योगाला संमिश्र राहिले. जीएसटी लागू होण्यापूर्वी कंपन्यांनी कारच्या किंमती कमी केल्या होत्या. आता जीएसटीनंतर कारच्या किंमतीत वाढ बघायला मिळाली. याव्यतरिक्त कंपन्यांनी कारचे नवनवीन मॉडल बाजारात सादर केले. खास दिवाळीनिमीत्त ऑक्टोबरमध्ये 5 SUV कार लाँच होणार आहेत. फक्त 20 हजार रुपये बुकींग रक्कम भरून तुम्ही या कार घरी नेऊ शकता.
  स्कोडा Kodiaq
  स्कोडा एसयूव्ही सेगमेंटमध्ये Kodiaq या नव्या कारचे लाँचिंग भारतात 4 ऑक्टोबरला करणार आहे. ही कार फोर्ड एंडेवर, टोयोटो फॉर्च्युनर आणि फॉक्सवॅगन टिगुआनशी स्पर्धा करेल. या कारसाठी ग्राहकांना फक्त 20 हजार रुपये बुकींग रक्कम अदा करावी लागेल. साधारणत: नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात या कारची डिलीव्हरी सुरु होईल. ही कार पेट्रोल आणि डिझेल इंजिनमध्ये उपलब्ध असेल.
  पुढील स्लाईडवर वाचा - या आहेत ऑक्टोबरमध्ये लाँच होणाऱ्या एसयूव्ही

 • cars launch in india october 2017
  रेनो Captur
   
  रेनो इंडियाचे सीईओ सुमित सहानी यांच्या मते भारतात एसयूव्ही कार सेगमेंटमध्ये भरघोस वाढ बघायला मिळाली आहे. त्यामुळे ग्राहकांची गरज लक्षात घेऊन कंपनीने Captur ही एसयूव्ही सादर करणार आहे. या कारची बुकींग सुरु झाली असून 25 हजार रुपयात बुकींग करता येईल्. ही कार दिवाळीच्या आसपास लाँच होण्याची शक्यता आहे.
   
 • cars launch in india october 2017
  फॉक्सवॅगन पसाट
   
  फॉक्सवॅगनने भारतात पसाट कार बंद केली होती. आता कंपनी या मॉडलमधील आठव्या जनरेशनसह भारतात 10 ऑक्टोबर 2017 ला लाँच करणार आहे. विशेष म्हणजे या कारमध्ये 9 एअरबॅग्स असणार आहेत. या कारची किंमत 30 ते 35 लाख रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे. 
   
 • cars launch in india october 2017
  न्यू लँड रोवर डिस्कवरी
   
  ब्रिटेन कार कंपनी लँड रोवरने न्यू डिस्कवरी कार ऑक्टोबरमध्ये लाँच करण्याची घोषणा केली आहे. ही कार भारतात 28 ऑक्टोबरला लाँच केली जाण्याची शक्यता आहे. या कारची एक्स शोरुम किंमत 68 लाख रुपये ठेवण्यात आली होती. मात्र, सेसमध्ये झालेल्या वाढीमुळे किंमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या कारची डिलीव्हरी नोव्हेंबर महिन्यात सुरु होईल.
   
   
 • cars launch in india october 2017
  फोर्ड इकोस्पोर्ट
   
  ही कार भारतातील पहिली कॉम्पॅक्टस एसयूव्ही कार असेल. ही कार ऑक्टोबरमध्ये लाँच केली जाणार असून हे फेसलिफ्ट वर्जन असेल. नव्या इकोस्पोर्टमध्ये एक्सटीरीअर आणि इंटीरिअरमध्ये बरेच बदल करण्यात आले. ही कार पावरफुल डीझेल इंजिनमध्ये सादर करण्यात आली आहे. 

Trending