Home »Business »Auto» SAIC Motor Corporation Will Launch MG Cars In India

या आहेत चीनी कंपन्यांच्या कार, लवकरच भारतीय बाजारात येण्याच्या तयारीत

दिव्य मराठी वेब टीम | Oct 04, 2017, 10:07 AM IST

नवी दिल्ली -भारतीय ऑटोमोबाइल मार्केटमध्ये चीनही एंट्री करण्याच्या तयारी आहे. चीनची कार कंपनी SAIC मोटार कॉर्पोरेशनने आपल्या अधिकृतपणे भारतीय मार्केटमध्ये येण्याची तयारी असल्याचे म्हटले आहे. कंपनी आपल्या ब्रिटिश स्पोर्टस कार ब्रँड एमजी (Morris Garages) च्या कार भारतात लाँच करेल.
SAIC मोटारने म्हटले की, आम्ही जीएम इंडियाच्या बंद पडलेल्या हलोल येथील प्लँटमध्ये आमची फॅक्ट्री लावणार आहोत. यामुळे या ब्रँडचे अनेक मॉडेल्स आगामी काळात भारतात पाहायला मिळतील. कंपनी भारतात 'मेक इन इंडिया' आणि 'स्किल इंडिया' कार्यक्रमाच्या अंतर्गत कार्य करणार आहे.
MG3 ही बी प्लस सेगमेंटची हॅचबॅक कार आहे. या कारच्या टक्करमध्ये भारतात मारुती बलेनो, ह्युंदाई एलिट आय20 आणि होंडा जॅज या कार आहेत. या कारचा व्हीलबेसही बलेनोप्रमाणे आहे. इतकेच नाही, याचे स्टँडर्ड सेगमेंट क्लायमेट कंट्रोल, रेन सेन्सिंग वायपर, चार तऱ्हेचे वन टच विंडोज, क्रूझ कंट्रोल आणि मल्टिपल एअरबॅग्ज आहेत.
पुढच्या स्लाइडमध्ये वाचा - या कारही आहेत लाँचिंगच्या रांगेत

Next Article

Recommended