Home | Business | Auto | Tata will launch nexon 21 September

फक्त 11 हजार रुपयांत करा बुकींग, 21 सप्टेंबरला लाँच होणार Tata Nexon

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 15, 2017, 10:25 AM IST

नवी दिल्ली - टाटाची कॉम्पॅक्ट असलेली स्पोर्टस युटिलीटी व्हेईकल सेग्मेंटमधील Nexon ही कार 21 सप्टेंबरला लाँच होत आहे. कंप

  • Tata will launch nexon 21 September
    नवी दिल्ली - टाटाची कॉम्पॅक्ट असलेली स्पोर्टस युटिलीटी व्हेईकल सेग्मेंटमधील Nexon ही कार 21 सप्टेंबरला लाँच होत आहे. कंपनीतर्फे डिलर्सकडे या कार पाठविण्यास सुरवात केली आहे. याव्यतरिक्त नव्या Nexon च्या बुकींगलाही सुरवात केली आहे. नव्या Nexonच्या बुकींगसाठी ग्राहकांना केवळ 11 हजार रुपये भरावे लागणार आहेत. टाटा मोटर्सची Nexon मारुती सुझुकीची विटारा, ब्रिझा, फोर्ड इकोस्पोर्ट, होंडा डब्ल्यूआर-वी आणि महिंद्राच्या टीयूव्ही 300 सोबत स्पर्धा आहे.
    हे आहेत Nexonचे स्पेसिफिकेशन
    टाटा मोटर्सच्या Nexonमध्ये 1.2 लिटर इंजिन थ्री सिलेंडर टर्बोचार्जसह पेट्रोल इंजिन राहिल. त्याचबरोबसा 15 लिटरचे चार सिलेंडर डिझेल इंजिनमध्येही उपलब्ध आहे. पेट्रोल व्हर्जनमध्ये टर्बोचार्ज टिआगो आणि टिगोरमध्येही बसविण्यात आले आहे. या इंजिनमध्ये 108 बीएचपी पावर आणि 170 एनएम टॉर्क निर्माण करण्याची क्षमता आहे.
    दुसरीकडे, डिझेल व्हर्जनमध्ये 108 बीएचपी पावर आणि 260 एनएम टॉर्क निर्माण करण्याची क्षमता आहे. लवकरच Nexon ला एएमटी व्हर्जनमध्ये सादर करण्याची शक्यता आहे.

Trending