Home »Business »Auto» You Can Buy These 5 Cars With Rs 5000 Emi

5 हजाराच्या आत EMI वर खरेदी करा या 5 कार, दसऱ्यानिमीत्त कंपन्यांकडून भरघोस ऑफर्स

दिव्य मराठी वेब टीम | Sep 29, 2017, 11:30 AM IST

नवी दिल्ली -दसऱ्याच्या मुहूर्तावर तुम्ही कार खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर ही योग्य वेळ आहे. कार खरेदी करतांना डाऊन पेमेंट आणि हप्त्याबाबत खूप विचार करावा लागतो. ज्यामुळे महिन्याकाठी कारचा हप्ता देणे जड जाणार नाही. तुम्ही महिन्याकाठी कारसाठी पाच हजार रुपये देऊ शकत असाल, तर तुम्ही लगेचच शोरुमला जाऊन या 5 कारच्या पर्यायांचा विचार करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त 1 लाख रुपये डाऊन पेमेंट द्यावे लागेल.
1. टाटा टिआगो
टाटा मोटर्सच्या पॉपुलर कारपैकी टिआगो ही कार आहे. देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे कार खरेदी करणाऱ्यांसाठी खास लोन स्किम सादर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत कार खरेदी करण्यासाठी तुम्हाला 9.5 टक्के व्याजाने कर्ज मिळू शकेल.
किंमत : 3.24 लाख रुपये
ईएमआय : 4,677 रुपये
डाउन पेमेंट : 1 लाख रुपये
महीने : 60
पुढील स्लाईडवर वाचा - या आहेत ऑफर्स

Next Article

Recommended