आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जग्वारची एफ-पेस स्पोर्ट्स कार ‘एफ-टाइप’पासून प्रेरित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सणांच्या काळात जग्वार आपली पहिली एसयूव्ही भारतातही लाँच करत आहे. ती २०१५ मध्ये फ्रँकफर्ट ऑटो शोमध्ये प्रदर्शित केली गेली होती. युरोपमध्ये एप्रिल २०१६ आणि अमेरिकेत मे २०१६ पासून ही गाडी उपलब्ध आहे. आता भारतही तिच्यासाठी तयार आहे.

विशेष म्हणजे भारतात तिचे भव्य लाँचिंग होणार आहे. सूत्रांनुसार, मुंबईत लंडनच्या ‘शार्ड’ इमारतीचे स्कल्प्चर बनवले जात आहे. ते ६० फूट उंच असेल. स्कल्प्चर अरजान खंबाटा बनवत आहेत आणि येथेच एफ-पेस लाँच केली जाईल. शार्डला ब्रिटिश इंजिनिअरिंगचा अजोड नमुना म्हटले जाते. जग्वारने असे करण्याचा हेतू स्पष्ट आहे. तिला एफ-पेसची प्रतिमाही तशीच दाखवायची आहे.

३६० डिग्री लूपमध्ये जागतिक विक्रम करणारी एफ-पेस दोन डिझेल इंजिनच्या पर्यायात लाँच होईल. एक २.० लिटरचे असेल, ते १८० बीएचपी देईल. हे इंजिन ८.७ सेकंदांत १०० किलोमीटर प्रति तासाचा वेग घेऊ शकते. तिचा टॉप स्पीड २०० किलोमीटर प्रति तास राहील.
दुसरे इंजिन ३.० लिटरचे असेल, तो ३०० बीएचपी देईल. हे इंजिन फक्त ६ सेकंदांत ० ते १०० किमी प्रतितासाचा वेग घेईल. त्याचा टॉप स्पीड २४१ किमी प्रतितास असेल.

- सुरुवातीची किंमत रु. ६८.४० लाख ठेवली आहे.
- एफ-पेसचे डिझाइन जग्वारची स्पोर्ट््स कार एफ-टाइपपासून प्रेरित आहे. स्पोर्ट््स कारच्या धर्तीवर तिच्या डायनामिक्सवर काम करण्यात आले आहे. त्यात कमी वजनाच्या धातूचा वापर झाला आहे, त्यामुळे ती उत्तम मायलेज देईल.

चार श्रेणींमध्ये होणार उपलब्ध
- प्युअर, प्रेस्टीज, आर स्पोर्ट्स आणि फर्स्ट एडिशन
- गिअर बॉक्स : ८ स्पीड ऑटोमॅटिक
- ड्राइव्ह : ऑल व्हील ड्राइव्ह सिस्टिमने सज्ज
- इंजिन : दोन डिझेल इंजिन ऑप्शनमध्ये २.० लिटर आणि ३.० लिटर.
- भारतात एफ-पेस कम्प्लिट बिल्ट युनिट मिळेल. फेब्रुवारी २०१७ पर्यंत ती भारतात तयार होईल.

रिस्ट बँडने कार होईल अनलॉक
एफ-पेससोबत एक ‘अॅक्टिव्हिटी की’ दिली जाईल. ते रबराचे एक रिस्ट बँड असेल, जसा ‘फिटबिट’ असतो. त्यात वॉटरप्रूफ बँडद्वारे कार लाॅक किंवा अनलॉक केली जाऊ शकेल. म्हणजे कारच्या बाहेर पडताना तुम्हाला चावी सोबत घेण्याची गरज राहणार नाही. तुम्ही पोहा, सायकलिंग करा किंवा रनिंग करा, प्रत्येक ठिकाणी चावी सांभाळण्याची चिंताही तुम्हाला सतावणार नाही. ते फर्स्ट इन सेगमेंट फीचर आहे.
बातम्या आणखी आहेत...