आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीप रँग्लरच्या पेट्रोल व्हर्जनची किंमत पूर्वीच्या तुलनेत कमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्‍क- गेल्या वर्षीच जीपचे पेट्रोल व्हर्जन भारतीय बाजारात सादर होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. आता कंपनीने नुकतेच जीप रँग्लर अनलिमिटेड मॉडेलचे पेट्रोल व्हर्जन सादर केले आहे. एफसीए(फिएट क्रिसलर ऑटोमोबाइल्स) ने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये जीप रँग्लरचे डिझेल व्हर्जन बाजारात उतरवले होते. याची किंमत ७१.५९ लाख रुपयांच्या अासपास होती. पेट्रोल रँग्लरची किंमत त्या तुलनेत कमी असून ५६ लाखांपासून सुरुवात होते. 

} पेट्रोल व्हर्जनमध्ये ३.६ लिटरचे पेंटास्टार व्ही ६ इंजिन दिले आहे. यात न्यू थर्मल मॅनेजमेंट सिस्टिम आहे. जीप रँग्लरच्या डिझेल मॉडेलमध्ये २.८ लिटरचे ४ सिलिंडर इंजिन देण्यात आले होते.  
} लेदर सीट, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल सिस्टिम, लेस एंट्री आणि ऑटो हेडलॅम्प ही याची वैशिष्ट्ये आहेत. ९ स्पीकरसोबत ६.५ इंची टचस्क्रीन अॅल्पाइन म्युझिक सिस्टिमही दिली आहे.  
} कमी किमतीची जीप रँग्लर असून मध्यम आकाराची एसयूव्ही मर्सिडीज जीएलसी आणि रेंज रोव्हर डिस्कव्हरी स्पोर्ट लाइनशी याची तुलना होत आहे.
 
वैशिष्ट्ये
} शक्ती      :    २८० बीएचपी 
} गिअर बॉक्स :    ५ स्पीड ऑटोमॅटिक
} वजन     :    २११९ किग्रॅ
 
 पॉवर डिस्कव्हरी आणि जीएलसीपेक्षा अधिक  
डिझेलच्या तुलनेत यामध्ये अधिक क्षमतेचे २७६८ सीसीचे पेट्रोल इंजिन आहे. याची लांबी ४५८३, रुंदी १८७७, उंची १८२९ एमएम. यात ८८४ लिटरची बूटस्पेस दिली आहे.
 
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, मर्सिडीझ जीएलसी आणि रेंज रोव्हर डिस्कव्हरी स्पोर्टकारचे वैशिष्‍टये 
 
 
बातम्या आणखी आहेत...