आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: रस्त्यावर भीक मागत आहेत या मॉडेल, नोकरी गेल्यामुळे आली ही परिस्थिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शुजियाहुई - चीनमध्ये शांघाय ऑटो शो सुरू झाला आहे, मात्र त्याला मोठ्या विरोधाला सामोरे जावे लागते आहे. कार शो मध्ये सहभागी करून न घेतल्याने बेरोजगार मॉडेल्सच्या एका ग्रूपने शुजियाहूईमधील ऑटो शो आणि त्यांच्या नव्या  निर्णया विरोधात आवाज उठवला आहे. भिकाऱ्यांप्रमाणे या मॉडेल्सने शोमध्ये सहभागी करून न घेतल्याने विरोध केला आहे. तसेच त्यांच्या उदरनिर्वाहासाठीची मागणी केली आहे. शुजियाहई स्टेशनवर मेट्रोसिटी बाहेर या मॉडेल्सने भीक मागण्याचे आंदोलन केले. 

मॉडेल्सच्या आंदोलनाचे हे फोटो ऑनलाईन वायरल झाल्यानंतर काही लोकांनी त्यांचे समर्थन केले. तर काहींनी याचा विरोधच केला. एका युजरने लिहिले आहे की, कार शोमध्ये सर्व लक्ष कारवर असायला हवे, तेथे टॉपलेस मॉडेलची गरज नाही. यावर्षी शांघाय ऑटो शोने एक मोठे पाऊल उचलत शो मध्ये मॉडेल्सच्या सहभागावर बंदी लावली आहे. या माध्यमातून ते ग्राहकांचे लक्ष थेट कार खेचण्याचा त्यांचा विचार आहे. 

शांघाय ऑटो शोच्या या बंदीमुळे योग्य प्रोफेशनल, सेल्स रिप्रेसेंटेटीव्ह आणि शॉपिंग गाईड्ससाठी पैसे कमावण्याचा मार्ग खुला करून दिला आहे. ऑटो शोमध्ये यावेळी कंपन्यांनी कारांच्या विक्रीमध्ये आकर्षक आणि तरूण सेल्स रिप्रेसेंटेटीव्ह, शॉपिंग गाईड्स आणि कार क्लिनरची मदत घेतली आहे. 

पुढील स्लाईडवर पाहा, शांघाय ऑटो शोच्या विरोधात रस्त्यावर उतरलेल्या मॉडेल्सचे फोटो...