आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

KAWASAKI सर्वात वेगवान बाइक NINJA H2 लॉन्च, किंमत 29 लाख रुपये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- जपानी बाइक मेकर कंपनी कावासाकीने आपली बहुप्रतीक्षित दमदार बाइक 'NINJA H2' लॉन्च केली आहे. या बाइकची किंमत 29 लाख रुपये (एक्स शोरूम, दिल्ली) आहे. या बाइकची कमाल पॉवर आउटपुट 207 बीएचपी आहे. या बाइकमध्ये प्रति ताशी 100 किलोमीटर धावण्याची क्षमता आहे. NINJA H2 ही भारतातील सगळ्यात वेगवान बाइक असल्याचा दावा कावासाकीने केला आहे.
NINJA H2ची वैशिष्ट्ये...
लिक्विड कूल्ड फोर स्ट्रोक इंजिन
इन लाइन फोर सिलिंडर
197 बीएचपी पॉवरचे इंजिन
भारतातील रस्ते लक्षात घेऊन Ninja H2 च्या बॅलेन्सवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. याशिवाय हेडलॅम्प, टर्न इंडिकेटर्स, टेल लॅम्प आणि रिअर व्ह्यु मिररला हटके लूकमध्ये देण्यात आले आहे.

पुणे, दिल्ली, चेन्नई, बंगळुरु आणि कोलकाता या पाच शोरुममध्ये Ninja H2 बाइक विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जाईल. यंदा आणखी कावासाकीचे दोन मॉडेल लॉन्च होणार आहेत. तसेच देशभरात 3 ते 4 नवे शोरूम सुरु करणार असल्याचे माहिती कावासाकी कंपनीच्या सूत्रांनी दिली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून फोटोंमधून पाहा Ninja H2 बाइकची झलक...