Home | Business | Auto | keep nail polish in car for your safety

कारमध्ये नेहमी ठेवा विनारंगाची नेल पॉलिश, टळेळ मोठे संकट

दिव्य मराठी | Update - Sep 26, 2017, 01:02 PM IST

कार चालवताना नेल पॉलिशची एक शीशी नेहमी सोबत ठेवा. यामुळे तुमच्यावर येणारे एखादे मोठे संकट टळू शकते. केवळ ट्रान्सपरन्ट म्

 • keep nail polish in car for your safety
  नवी दिल्ली- कार चालवताना नेल पॉलिशची एक शीशी नेहमी सोबत ठेवा. यामुळे तुमच्यावर येणारे एखादे मोठे संकट टळू शकते. केवळ ट्रान्सपरन्ट म्हणजे विना रंगाची नेलपॉलिस गाडीत ठेवा. कोणत्याही कारणाने तुमच्या गाडीच्या काचेला तडा गेल्यास ही नेलपॉलिश तुमच्या खुप उपयोगी पडू शकते. ही नेलपॉलिश काचेला गेलेला तडा तेवढ्यावरच थांबवण्यास मदत करेल. तो वाढणार नाही, उलट काचेचा तडा छोटा असेल तर तो तिथेच जोडला जाईल. तुम्हाला काच बदलायचा नसेल, तर या नेलपॉलिशने तुमचा खर्च वाचेल.

  तुम्ही एखाद्या लॉन्ग टूरवर निघाले असाल आणि कोणत्याही कारणाने कारच्या काचेला तडा गेल्यास तुमची ट्रिप खराब होऊ शकते. तुम्ही तडा गेलेल्या काचेसोबत कार चालवत असाल तर, झटका लागून किंवा हवेच्या दबावाने काच तुटूही शकते. कारचा काच एखाच वेळेत संपुर्ण तुटतो. असे झाल्यास तुमच्यासाठी मोठी अडचण निर्माण होऊ शकते. अशात रस्त्यातच तुम्हाला काच दुरूस्त करून देणारा भेटेल याचीही शाश्वती नसते. त्यामुळे गाडीत अशा प्रकारच्या वस्तू ठेवणे गरजेचे असते. तसेच, त्यांचा वापर करण्याची प्रक्रिया देखिल माहिती असने गरजेचे असते.

  पुढील स्लाइडवर जाणून घ्या, कसा कराल नेलपॉलिशचा उपयोग...?

 • keep nail polish in car for your safety
  असा करा नेलपॉलिशचा उपयोग...
   
  > अशा परिस्थितीत गाडीला एखाद्या सावलीच्या ठिकाणी घेऊन जा. ते शक्य नसल्यास जेथे आहात तेथेही काम सुरू करू शकता.
  > सर्वप्रथम क्लिनर किंवा कपड्याने त्या जागेला स्वच्छ करून घ्या. जर क्लिनर नसेल तर पाण्याने स्वच्छ करा. पण स्वच्छ करणे आवश्यक आहे.
  > त्यानंतर योग्य प्रमाणात नेलपॉलिश घेऊन कचेला तडा गेलेल्या ठिकाणी प्रत्येक भागात लावा. कारच्या आतून आणि बाहेरून दोन्ही बाजूने नेल पॉलिशची कोटिंग करावी.
  > त्यानंतर कारला उन्हात उभी करून नेलपॉलिश सुखू द्या.
  > नेलपॉलिश तुमच्या कारच्या काचेवर पडलेले तडे भरून काढेल. तसेच, त्यापेक्षा अधिक मोठा तडा जाण्यापासून वाचवेल.

Trending