Home »Business »Auto» Know About The Marauder Car Which Consider One Of The Most Powerful Vehicle

ट्रकपेक्षा शक्तीशाली, मिसाईल हल्ल्यातही धक्का लागणार नाही, अशी आहे ही कार...

दिव्य मराठी वेब टीम | Aug 31, 2017, 16:36 PM IST

नवी दिल्ली - सुपर कारचा विषय आला की विचारले जाते, की ती कार किती सेकंदात 0-100 किमी ताशी स्पीड पकडणार आहे. मात्र, मजबूत कारबद्दल हेच की ती कार किती जबरदस्त हल्ला सहन करू शकते. आणि एखाद्या कारमध्ये ट्रकची ताकद आणि चक्क क्षेपणास्त्र हल्ला सहन करण्याची क्षमता असेल तर...?
- ही एक अशी कार आहे, ज्यास ताकद आणि सुरक्षेच्या बाबतीत कुणीही मात देऊ शकणार नाही. ही कार चक्क एखाद्या चालू ट्रकला सुद्धा उटल्या दिशेने ओढू शकते.
- हवे तेव्हा ही कार तब्बल 700 किमी ताशी स्पीड सुद्धा पकडू शकते. मजबुतीच्या बाबतीत बोलावयाचे झाल्यास या कारवर छोटे क्षेपणास्त्र किंवा बॉम्ब सुद्धा पडल्यास कारला धक्का सुद्धा लागणार नाही.
- या कारचे नाव मॅराडर असून तिला जगातील सर्वात मजबूत कार म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

अशी झाली लोकप्रीय
- ही कार केवळ लष्करी वापरासाठी विकसित करण्यात आली होती.
- 2011 मध्ये ब्रिटिश माध्यमावर 'टॉप गिअर' या कार्यक्रमात कारची वैशिष्ट्ये मांडण्यात आली होती. सामान्य नागरिकांसाठी ही कार कशी उपयोगी ठरू शकते ते यात मांडण्यात आले होते. तेव्हापासूनच कारची लोकप्रीयता देशभर पसरली.
- टीव्ही शो दरम्यान या कारची तुलना 'हमर'शी करण्यात आली होती. मजबूतीच्या बाबतीत या कारने हमरला सहज मात दिली.
- एवढेच नव्हे, तर शो मध्ये ही कार इतर उभ्या असलेल्या गाड्यांवरून नेण्यात आली. तेव्हा खालच्या वाहनांना दाबून ही कार पुढे निघून गेली. यानंतर ही कार जगभरात व्हायरल झाली.
आणखी फोटोज आणि फीचर्ससाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...

Next Article

Recommended