आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशातील पहिली एंट्री लेव्हल अर्बन क्रॉस आहे 'रेडी-गो'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंट्री लेव्हल हॅचबॅक श्रेणीत डॅटसनने आणखी एक मॉडेल आणले आहे. बजाज ४०० सीएस आणि हीरो जिरही या वर्षात लाँच होणार आहेत.

डेटसनची रेडी-गो डिझाइन व डायमेन्शन्समुळे अर्बन-क्राससारखी दिसते. कारण तिचा ग्राउंड क्लिअरन्स क्रॉसओव्हरसारखा असून डिझाइन कॉम्पॅक्ट अर्बन हॅचबॅकसारखे आहे.
डेटसनने भारतात आपली एंट्री लेव्हल हॅचबॅक रेडी-गो बाजारात आणली आहे. ती रेनो क्विडच्या प्लॅटफॉर्मवर डिझाइन केली आहे. एवढेच नव्हे तर क्विडच्या इंजिनाचाही त्यात वापर केला आहे. त्यामुळे पॉवर व मायलेज समान आहे. फक्त डिझाइन वेगळे आहे.

क्विडचा प्लॅटफॉर्म व इंजिनावर डेटसनने एक नवीन डिझाइन तयार केले असे म्हटल्यास ते चुकीचे ठरणार नाही. क्वीड आणि रेडी-गोमध्ये बरेच साधर्म्य असताना काही फरकही आहे. भारतीय बाजारपेठेत ती मारुती अल्टोशी स्पर्धा करेल. डेटसन त्यास देशातील पहिली अर्बन-क्रॉस संबोधत आहे. त्याचे डिझाइन आणि डायमेन्शन्स पाहून ती अर्बन-क्रॉससारखी वाटते.
यामागचे कारण
म्हणजे तिचा ग्राउंड क्लिअरन्स कोणत्याही क्रॉसओव्हरसारखा आहे आणि डिझाइन कोणत्याही कॉम्पॅक्ट अर्बन हॅचबॅकसारखा आहे. मारुती ऑल्टोशी तुलना केल्यास डेटसन रेडी - गो काही पावले पुढेच आहे.
पुढे वाचा..

बातम्या आणखी आहेत...