आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Auto: जाणून घ्‍या, आगामी वर्षात बाजारात दाखल होणा-या उच्च तांत्रिक एसयूव्ही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
येत्या २ वर्षांत बाजारात उतरवण्यात येणा-या एसयूव्ही श्रेणीतील कारसंबंधी यापूर्वीच्या सदरात माहिती दिली होती. एसयूव्ही सदराचाच हा दुसरा भाग...

बॉडी ऑन फ्रेम टफनेस
फोर्ड एंडेव्हर : कारमध्ये दोन बाबींचा परिपूर्ण मेळ आहे. तंत्रज्ञान व मजबुती. बॉडी ऑन फ्रेम टफनेसला तोडच नाही. मोठ्या आकाराचे व्हील आर्क, मॅसिव्ह बॉनेट व बिड फोर्ड ग्रीलमुळे हिचा लूक भरदार दिसतो. यावर असलेल्या मॉडर्न लाइन्समुळे एसयूव्हीला शार्प लूक आलाय. कारमध्ये ब्रॉड स्वीपिंग डॅश आहे. सीट्सवर लावलेल्या लेदर कव्हरवर डबल स्टिचिंग दिली आहे. यात ८ इंची टचस्क्रीन असून सिंक-२ कनेक्टिव्हिटी दिली आहे. केबिनमध्ये ३० विविध स्टोअरेज स्पेस आहेत.

किंमत: रु२६-३० लाख
केव्हा येणार: २०१५

हॅचबॅक आणि सॉफ्टरोडरसुद्धा...
मारुती एस-क्रॉस : मारुतीची नवी क्रॉस रेनॉ डस्टरच्या मुकाबल्यात उतरवली जाईल. ही कार हॅचबॅक आहे व सॉफ्टरोडरसुद्धा. एसएक्स ४ च्या तुलनेत क्राॅस खूप आधुनिक आहे. मात्र हिला लांब व्हीलबेसवर बनवण्यात आले आहे. ही खूप स्टायलिश व टेंपरिंग रूफ कार आहे. यात एसयूव्ही डिझाइनचे अनेक फीचर्स आहेत. स्टफ प्लेट्स, क्लॅडिंग, व्हिजिबल रूफ रेल्स एसयूव्हीप्रमाणे आहेत. वाजवी दरातील कारची अनेक वैशिष्ट्ये यात आहेत. इंटेरिअर विशेष नाही.
किंमत: रु १२-१४ लाख
केव्हा येणार: २०१५
लँड रोव्हर बेस्ड एसयूव्ही
टाटा क्यू ५०१ : क्यू ५०१ लँड रोव्हर व टाटा मोटर्सचे संयुक्त उत्पादन आहे. दोन्ही कंपन्यांच्या भागीदारीतील ही पहिली कार ठरेल. न्यू डिस्कव्हर स्पोर्टच्या धर्तीवर या कारची घडण होणार आहे. ही कार महिंद्रा एसयूव्ही ५०० व टोयोटा फॉर्च्युनरसारख्या कारला स्पर्धा निर्माण करेल. दोन्ही कंपन्यांच्या भागीदारीने कार तयार होत असली तरीही तिची स्वतंत्र आेळख निर्माण होईल. यातील काही स्ट्रक्चर्स लँड रोव्हरसारखे असतील.
किंमत: रु १६-२० लाख
केव्हा येणार: २०१७
पुढे वाचा, सर्वश्रेष्ठ ऑफ-रोड व्हेइकल