आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्‍या, लाखाच्या आतील दोन अॅडव्हेंचर बाइक्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज दोन मोटारबाइक्सविषयी माहिती दिली आहे. बजाज पल्सर एएस १५० आणि सुझुकी गिक्सर एसएफ. बजाजच्या बाइकला विशेष ग्राहकांसाठी सादर केले आहे. मात्र सुझुकी गिक्सर तसूभरही कमी नाही. दोन्ही बाइक्सच्या वैशिष्ट्यांविषयी...

>भरधाव वेगाने बाइक राइड घेताना चालकाला त्रास होऊ नये यासाठी बजाज पल्सर बाइकमध्ये प्रॅक्टिकल विंड ब्लास्ट प्रोटेक्शन फीचर आहे. यात पोटेंट प्रोजेक्टर हेडलॅम्पला खुबीने फिट करण्यात आले आहे. रात्रीच्या वेळी रस्ता स्पष्ट दिसतो. एलईडी पायलट लाइटने नव्या पल्सरला मॉडर्न टच दिला आहे. सुझुकी गिक्सरचा हेडलाइट थेट बॅटरीशी कनेक्ट करण्यात आलाय. रात्रीच्या वेळी ब्राइट बीम दिसून येते. दोन्ही चाकांवर रिफ्लेक्टिव्ह टेपिंग दिले आहे.
>बजाज पल्सरमध्ये सुंदर दिसणारा डिजि-अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट कन्सोल लावण्यात आलाय. याद्वारे वेळ कळते. शिफ्ट-इंडिकेटर लाइट आणि साइड-स्टँड एंगेज्ड वॉर्निंग, डिजिटल स्पीडोमीटर आणि अॅनालॉग टॅशोमीटर देण्यात आले आहे. रि र-व्ह्यू मिररचा रिस्पॉन्स चांगला आहे. सुझुकी गिक्सर एसएफमध्ये इन्फर्मेटिव्ह आणि पूर्ण डिजिटल इन्स्ट्रुमेंट आहे. यात जो गिअर निवडला आहे, त्याची माहिती व वेळ कळू शकते. यात ब्राइट शिफ्ट वॉर्निंग लाइट्स आहेत. बाइक रेव्ह लिमिटर टच करताच लाइट्स चमकतात. यात फेअरिंग माउंटेड रिअर व्ह्यू मिरर आहेत. हे सुंदर दिसतात, मात्र जास्त रुंद आहेत. पाम ग्रिप इफेक्टिव्ह आहेत. कंट्रोल लिव्हर्समुळे फील-गुड फॅक्टर मिळतो.
>बजाजच्या नव्या बाइकमध्ये पेटेंट ट्विन स्पार्क टेक्नॉलॉजी वा जीटीएस-आय आहे. एफर्टलेस शिफ्टींगसाठी यात लाइट-अॅक्शन क्लच आहे. याचप्रमाणे सुझुकीचा क्लचही सहजरीत्या ऑपरेट करता येतो. दोन्हीत १२ लीटर फ्यूएल टँक आहे.
>पल्सरची सीटिंग पोझिशन अपराइट व आरामदायक आहे. ही बाइक दैनंदीन वापरासही उपयुक्त आहे. सुझुकी गिक्सरला शहरातील अरूंद रस्त्यांवर अगदी सहजतेने वापरता येते. यावर टर्न घेणे फार सोपे आहे.