आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाच मोठ्या बदलांसह केटीएम ड्यूक ३९० होणार दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑस्ट्रेलियन कंपनी ‘केटीएम’ जगभरात आपल्या कमी वजनी नेकेड, स्पोर्ट्सस टुअरर आणि सुपर स्पोर्ट्सस बाइक्ससाठी प्रसिद्ध आहे. बजाज ऑटोने भारतात केटीएम सादर केली होती. पहिली बाइक ‘ड्यूक २००’ ‘रेडी फॉर रेस’ टॅगसह सादर झाली होती. यानंतर कंपनीने ‘ड्यूक ३९०’ आणि लगोलग ‘आरसी २००’ आणि ‘आरसी ३९०’ सादर केल्या. इंडियन बाइक चाहत्यांनी या मॉडेल्सना पसंती दिली. शिवाय इंडियन रोड अँड ऑफ रोड रॅलीजमध्येदेखील या दिसू लागल्या.

असो, तर विशेष बाब ही की २०१७ च्या सुरुवातीला केटीएम नेकेड ड्यूक ३९० ला एका नव्या रंगात भारतीय बाजारात सादर केले जाईल. या मॉडेलला काही दिवसांपूर्वी ईआयसीएमए मोटारसायकल शो-२०१६ मिलान (इटली) येथे सादर करण्यात आले होते. डिझाइनमध्ये अनेक बदल आहेत. शिवाय ५ मोठे बदल यात आहेत. ड्यूक ३९० आता पूर्वीपेक्षा अधिक शार्प आणि अग्रेसिव्ह दिसत आहे. पाच मोठ्या बदलांविषयी...
सर्वात मोठा बदल टीएफटी कलर डिस्प्ले स्क्रीन

नव्या ३९० मध्ये सर्वात मोठा बदल टीएफटी कलर डिस्प्ले स्क्रिन आहे. यासोबत स्मार्टफोन जोडता येतो. ही स्क्रीन बाइकच्या सेटिंगला दर्शवते. यापूर्वी ३९० मध्ये ब्लॅक अँड व्हाइट डिस्प्ले स्क्रीन होती.
३९० चे डिझाइन सुपर ड्यूक १२९० ने प्रेरित

नव्या ड्यूक ३९० चे फ्रंट, रिअर आणि साइड व्ह्यू केटीएमच्या सुपर ड्यूक १२९० ने प्रेरित आहे. त्यामुळे ही पूर्वीपेक्षा अधिक अॅग्रेसिव्ह दिसते. यात दिलेले ऑल न्यू स्प्लिट हेडलॅम्पला सुरेखरीत्या घडवले आहे.
पुढील स्‍लाइडवर क्लिक करून जाणून घ्‍या बाईक्‍सचे इतर फिचर
बातम्या आणखी आहेत...