आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'मर्सिडीज बेंज\'ने लॉन्च केली मेड इन इंडिया GLA-Class SUV, 18 KMPL मायलेज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कारचे उद्घाटन करतान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर - Divya Marathi
कारचे उद्घाटन करतान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर
पुणे- लक्झरी कार निर्माता कंपनी 'मर्सिडीज बेंज'ने मेड इन इंडिया स्पोर्ट्स यूटिलिटी व्हीकल (एसयूव्ही) GLA Class आज (गुरुवार) सादर केली. GLA Class कारची किंमत 34.25 लाख रुपये आहे. (एक्स शोरूम पुणे) याआधी GLA 200 सीडीआय स्टाइल' ही कार सादर केली होती. या मॉडेलची किंमत 31.31 लाख रुपये आहे.

GLA Class डिझेल आणि पेट्रोल, अशा दोन्ही व्हेरिएंटमध्ये ही कार येणार आहे. सध्या डिझेल व्हेरिएंट सादर करण्‍यात आले आहे. एक लिटर इंधनमध्ये ही कार 17.9 किलोमीटरचा मायलेज देईल, असा दावा कंपनीने केला आहे. भारताशिवाय थायलंड, व्हियतनाम, मलेशिया आणि इंडोनेशियात देखील मर्सिडिजचे प्रॉडक्शन युनिट आहेत.
GLA Class कारच्या लॉंचिंगला केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावळेकर आणि राज्याचे मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. फडणवीस यांनी यावेळी पहिल्या कारची ड्राइव्ह घेतली.

कंपनीने दिलेली माहिती अशी की, पुणे येथील फॅक्टरीत GLA SUV चे प्रॉडक्शन सुरु झाले आहे. एक हजार कोटींच्या या प्रॉडक्शन युनिटमधून वर्षाकाठी 20 हजार कारची निर्मिती करण्यात येईल.
GLA Class कारचे वैशिष्ट्ये...
> मर्सिडीज बेंज GLA Class मध्ये 2 इंजिन पर्याय
> अवघ्या 9.9 सेकंदात 0-100Km/h चा वेग
> 2143cc आणि 136bhp पॉवरचे इंजिन
> 300Nm @ 1600-3000 rpm
> 205Km/h चा टॉप स्पीड
> GLA 200 CDI Styleची किंमत - 31.31 लाख रुपये
> GLA 200 CDI Sportची किंमत - 34.25 लाख रुपये

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, संबंधित फोटो