आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Maruti Ignis झाली लॉन्च, लो बजेट आणि फ्यूल एफिशिएंट; 26.8 kmpl चा मायलेज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑटो डेस्क- मारुती सुझुकीने आपली लो बजेट आणि फ्यूल एफिशिएंट कार Ignis (इग्निस) शुक्रवारी लॉन्च केली. 4 मीटरपेक्षाही छोटी आणि हॅचबॅक सेगमेंटची ही कार 26.8 kmpl (डिझेल) चा मायलेज देईल, असा दावा कंपनीने केला आहे. पेट्रोल आणि डिझेल, अशा दोन्ही व्हेरिएंट्समध्ये ही इग्निस कार उपलब्ध करून देण्यात आली आहे.

विशेष म्हणजे न्यू कारमध्ये AMT (ऑटोमॅटिक मॅन्युअल ट्रान्समिशन) देण्यात आले आहे. कारचे बेस मॉडल 5.5 लाख आणि टॉप एंड 8.5 लाख रुपयांत बाजारात उपलब्ध असेल. 
 
कमी किमतीत मिळेल दमदार इंजिन आणि हायटेक फीचर्स...
- मारुती इग्निसमध्ये पेट्रोल इंजिन 1.2 लिटर आणि डिझेल इंजिन 1.3 लिटर क्षमतेचे आहे. पेट्रोल इंजिन 6000rpm वर 84bhp पॉवर तर डिझेल इंजिन 4000rpm वर 75bhp पॉवर जनरेट करते. 
- इग्निस 5 स्पीड मॅन्युअल आणि AMT अशा दोन्ही ऑप्शनमध्ये उपलब्ध असेल.

हॅचबॅक क्रॉस एसयूव्ही
- मारुतीने आपल्या नव्या कारला 'हॅचबॅक क्रॉस एसयूव्ही' असे टायटल दिले आहे. याचा अर्थ असा की, इग्निस कार हॅचबॅक (छोटी कार) असून तिचा लूक एसयूव्ही सारखा आहे. इग्निसला कॉम्पॅक्ट एसयूव्ही संबोधण्यात येत आहे. 
- कारमध्ये ABS (एंटी-लॉक ब्रेकिंग सिस्टिम), ड्युअल एअरबॅग, एसी, फ्रंट 2 पॉवर विंडो, अॅडजस्टेबल स्टेअरिंग आणि 12V सॉकिट देण्यात आले आहे. 
- 'कॉन्सेप्ट इग्निस आणि कॉन्सेप्ट बलेनो मारुतीच्या थर्ड जनरेशन कस्टमरला ही कार आकर्षित करेल', असे मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर केनिची आयुकावा यांनी सांगितले आहे.  

पुढील स्लाइड्सवरील इन्फोग्राफिक्समध्ये पाहा, इग्निसमधील स्पेसिफिकेशन्स... 

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)