आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमअँडएमने ‘सुप्रो’ ब्रँडअंतर्गत आणली 7 वाहने, यात 4 प्रवासी तर 3 कार्गो

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - महिंद्रा अँड महिंद्रा (एमअँडएम) लिमिटेडने शुक्रवारी आपल्या “सुप्रो’ ब्रँड अंतर्गत सात नवीन उत्पादने बाजारात आणले आहेत. यामध्ये चार प्रवासी श्रेणीचे - सुप्रो मिनी व्हॅन, सुप्रो मिनी व्हॅन व्हीएक्स, सुप्रो मिनी व्हॅन सीएनजी आणि सुप्रो स्कूल व्हॅन यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त कार्गो वाहन श्रेणीमध्ये तीन - सुप्रो मिनी ट्रक, सुप्रो मिनी ट्रक सीएनजी आणि सुप्रो  कार्गो व्हॅन यांचा समावेश आहे.  

एमअँडएमचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (ऑटोमोटिव्ह) प्रवीण शाह यांनी  सांगितले की, मिनी व्हॅन ४.५४ लाख रुपये (एक्स-शोरूम- पुणे, बीएस ४ व्हेरिएंट), तर सुप्रो मिनी ट्रकची किंमत ४.२४ लाख रुपये (एक्स शोरूम - पुणे, बीएस४) पासून होते. कंपनीने “सुप्रो’ ब्रँडअंतर्गंत आतापर्यंत ११ नवे मॉडेल सादर केले असून त्या डिझेल, सीएनजी आणि  इलेक्ट्रिक व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहेत. ही सर्व वाहने राज्यातील चाकण येथे असलेल्या कंपनीच्या अत्याधुनिक सयंत्राने बनतात. एमअँडएम या मॉडेलवर  दोन वर्षे किंवा ६०,००० किलोमीटर दोन्हीपैकी जे आधी असेल तोपर्यंत वॉरंटी देते. एमअँडएमच्या ३.५ टनापेक्षा कमी वजन असणाऱ्या वाहनांच्या श्रेणीची बाजारातील भागीदारी ५१ टक्क्यांसह प्रथम  क्रमांकावर आहे. १.१९ लाख कोटी रुपयांच्या महिंद्रा समूहाचा हा एक भाग आहे.
 
बातम्या आणखी आहेत...