Home | Business | Auto | Mahindra and Mahindra launched new variant of Scorpio

महिंद्राची नवीन सर्वांत पॉवरफुल Scorpio लॉंच, हे फिचर्स टाकेल इतर SUV ला मागे

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 17, 2017, 10:46 AM IST

नवी दिल्ली- तीन वर्षांनी महिंद्रा अॅण्ड महिंद्राने सर्वांत पॉवरफुल स्पोट्स युटिलिटी व्हेईकल (एसयुव्ही) स्कॉर्पियोचे मिड-

 • Mahindra and Mahindra launched new variant of Scorpio

  नवी दिल्ली- तीन वर्षांनी महिंद्रा अॅण्ड महिंद्राने सर्वांत पॉवरफुल स्पोट्स युटिलिटी व्हेईकल (एसयुव्ही) स्कॉर्पियोचे मिड-लाइफ फेसलिफ्ट व्हर्जन लॉंच केले आहे. कंपनीने याची किंमत ९.९७ लाख रुपयांपासून १६.०१ लाख रुपये (एक्स शोरुम दिल्ली) ठेवली आहे. महिंद्राने सध्याच्या स्कॉर्पियोला सप्टेबर २०१४ मध्ये लॉंच केले होते. तेव्हापासून याला अपडेट करण्यात आले नव्हते. नवीन सादर करण्यात आलेल्या स्कॉर्पियोच्या इंटेरिअर आणि एक्सटेरिअरमध्ये बदल करण्यात आला आहे. आतापर्यंत सादर करण्यात आलेली ही सर्वांत पॉवरफुल स्कॉर्पियो असल्याचा दावा कंपनीने केला आहे. सात, आठ आणि नऊ सिटर कॉन्फिग्रेशनमध्ये ती लॉंच करण्यात आली आहे.

  इंजिन आणि पॉवर
  स्कॉर्पियोचे टॉप मॉडेल एस-७ आणि एस-११ ट्रिम्समध्ये पॉवरफुल इंजिन बसवले आहे. २.२ लीटर mHawk इंजिन आता १४० एचपी पॉवर आणि ३२० एमएम टॉर्क जनरेट करते. याची आधीची क्षमता १२० एचपी आणि २८० टॉर्क होते. सहा स्पीड मॅन्युअलसह हे सादर करण्यात आले आहे. तसेच ४ व्हील ड्राइव्हच्या ऑप्शनसह बाजारात आणले आहे.

  बेस मॉडेलचे इंजिन
  बेस मॉडेल एस-३ मध्ये २५२३ सीसी डिझेल मोटर आहे. ते ७५ एचपी पॉवर आणि २०० एनएम टॉर्क जनरेट करते. तसेच मिड व्हेरायंट एस-५ आणि एस-७ मध्ये लागलेले इंजिन १२० एचपी पॉवर आणि २८० एनएम टॉर्क जनरेट करते. दोन्ही इंजिनमध्ये ५ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आले आहेत. या शिवाय सर्व इंजिनला मायक्रो हायब्रिडसह पेश केले आहे. महिंद्राच्या इंजिन स्टार्ट-अप टेक्नॉलिजीचा हा भाग आहे.

  पुढील स्लाईडवर वाचा, महिंद्राच्या सर्वांत पॉवरफुल एसयुव्हीच्या नवीन व्हर्जनबद्दल...

 • Mahindra and Mahindra launched new variant of Scorpio

  एक्सटिरिअरमध्ये बदल
  स्कॉर्पियो फेसलिफ्टच्या एक्सटिरिअरमध्येही बदल करण्यात आला आहे. यात नवीन ग्रीड डिझाईनसह ७ स्लेट्स आहेत. फ्रंट बंपरही बदलण्यात आले आहे. या शिवाय नवीन प्रोजेक्टर हॅडलॅम्प, नवीन राऊंड फॉग, लॅम्प, विंग मिररवर टर्न इंडिकेटर्स आणि १७ इंच अलॉय व्हील्स बसविण्यात आले आहेत. रीयरमध्ये नवीन बंपर, टेल लॅम्पसााठी नवीन रेड थीम, नवीन व्हायपर आणि रिडिझाईन टेलगेट बसविण्यात आला आहे.

 • Mahindra and Mahindra launched new variant of Scorpio

  इंटेरिअरमध्ये बदल
  स्कॉर्पियो फेसलिफ्टच्या टॉप मॉडेल्समध्ये नवीन फॉक्स लेदर अप्होल्सटरी, स्टीअररिंग व्हील आणि गिअर लीव्हर  यातही अशाच प्रकारचे लेदर वापरले आहे. नेव्हिगेशन सिस्टिममध्ये टचस्क्रीन इंफोस्टेनमेंट स्टिस्टिमसह रिअर पार्किंग कॅमेरा आहे. या शिवाय गिअर लीव्हरजवळ वॉटर बॉटल आणि मोबाईल फोन साठी जागा आहे.

   

  तसेच टॉप मॉडेलमध्ये क्रूज कंट्रोल, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टर, ऑटोमॅटिक हेडलॅम्प आणि व्हायपर, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि महिंद्राचे ब्ल्यू सेन्स अॅप जेकी इंफोटेनमेंट सिस्टिमला कंट्रोल करते.

 • Mahindra and Mahindra launched new variant of Scorpio

  जाणून घ्या किमती
  फेसलिफ्ट मॉडेल्सच्या किमती ९.९७ लाखांपासून १६.०१ लाखांपर्यंत आहेत.

   

  मॉडेल्स आणि किंमत
  S3 2WD- 9.97
  S5 2WD- 11.62
  S7 120 2WD- 12.69
  S7 140 2WD- 12.99
  S11 2WD- 14.79
  S11 4WD- 16.01

Trending