आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Bullet ला टक्कर देईल महिंद्राची Jawa येज्डी, असे आहेत आकर्षक फिचर्स

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- जावा येज्डीची वेगळी ओळख करुन देण्याची गरज नाही. भारतात मोटारसायकल चाहत्यांना हे नाव परिचयाचे आहे. भारताच्या हेवी अॅण्ड परफॉमन्स बाईक मार्केटवर कधी काळी या ब्रांडचे अधिराज्य होते. पण एमिशन नॉर्म, प्रोडक्ट प्लॅनिंगमध्ये उणीवा आणि फोर स्ट्रोक इंजिन आल्यानंतर या ब्रांडचा अंत झाला. १९६० मध्ये पहिल्यांदा लॉंच झाल्यानंतर १९९६ मध्ये या ब्रांडला बंद करण्यात आले. पण आता हा व्हायब्रंट ब्रांड परत येतोय.

 

महिंद्रा अॅण्ड महिंद्रा या कंपनीने भारतासाठी हा ब्रांड विकत घेतला आहे. हा ब्रांड आता भारतात लॉंच केला जाईल अशी घोषणा कंपनीने केली आहे. त्यामुळे ३५० सीसी बाईक मार्केटवर ९० टक्के पकड असलेल्या रॉयल इनफिल्डचा मोठा झटका बसू शकतो.

 

महिंद्राकडे ब्रांड वापरण्याचा अधिकार
महिंद्रा अॅण्ड महिंद्रा या कंपनीने क्लासिक लिजेंड अंतर्गत चेकोस्लोव्हाकिया येथील मोटारसायकल कंपनी जावासोबत एक्सक्लुझिव्ह ब्रांड लायसन्सिंग अॅग्र्रीमेंट केला आहे. सोप्या शब्दांत सांगायचे झाले तर महिंद्राने क्लासिक लिजेंड विकत घेतले आहे. या कंपनीकडे BSA चाही स्टेक आहे. आता महिंद्रा या ब्रांडचा पूर्ण वापर करुन घेऊ शकते.

 

पुढील स्लाईडवर वाचा, महिंद्राचे फ्युुचर प्लॅनिंग आणि या ब्रांडबद्दल....

बातम्या आणखी आहेत...