आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Mahindra Bets Big Through Launch Of Compact SUV TUV 300

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महिंद्राची स्टायलिश एसयूव्ही "टीयूव्ही ३००' सादर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चाकण - महिंद्रा अँड महिंद्राने त्यांची नवी काॅम्पॅक्ट एसयूव्ही "टीयूव्ही ३००' सादर केली आहे. टीयूव्हीचा अर्थ टफ युटिलिटी व्हेकल असा हाेतो. पुण्याची त्याची एक्स शोरूम किंमत ६.९ लाख रुपये ठेवण्यात आली आहे. ही डिझेल गाडी असून याच्या सर्वात वरच्या मॉडेलची किंमत ९.१२ लाख रुपये आहे. ही एसयूव्ही सात प्रकार आणि सहा रंगांमध्ये उपलब्ध आहे.

टीयूव्ही ३०० नव्या तांत्रिक फिचर्ससह फ्लॅट रुफ, मोठ्या खिडक्या आणि जास्त ग्राउंड क्लिअरन्सने सज्ज आहे. ६१.५ किलाेवॅट पॉवर (८४ बीएचपी), १८.४९ किमी प्रतिलिटरचा मायलेज, २३० एनएम टॉर्क, ऑटो शिफ्ट टेक्नॉलॉजी (ऑटोमेटेड मॅन्युअर ट्रान्समिशन), सात सीटर, ड्यूअल एअरबॅक देण्यात आले आहेत.

बाजारात या गाड्यांसोबत स्पर्धा
टीयूव्ही ३०० ची सरळ स्पर्धा मारुती सुझुकीने नुकतीच सादर केलेली एस-क्रॉस आणि ह्युंदाईची क्रेटा सोबत हाेईल. या व्यतिरिक्त ती फोर्ड इकोस्पोर्ट, रेनॉ डस्टर, टोयोटा इटिओस क्रॉस, ह्युंदाई आय २० एक्टिव्ह आणि फिअॅट अॅव्हेंचुराला देखील टक्कर देईल.

सुरक्षीत गाडी
टीयूव्ही ३०० भारत न्यू व्हेकल सेफ्टी असेसमेंट प्रोग्राम (बीएनव्हीएसएपी) च्या अनुसार सर्वाेच्च सुरक्षा गुणांकन मिळवण्यासाठी सज्ज आहे. सर्व प्रकारच्या सुरक्षा निश्चिंती करण्यासाठी टफ, मजबूत स्टील बॉडी शेल, क्रंपल जोन, हाइड्रो-फॉम्ड क्रश टिप्ससह येते. याव्यतिरिक्त यामध्ये ईबीडीसह ड्यूअल एअरबॅग्स आणि कॉर्नर ब्रेक कंट्रोल (सीबीसी)ची सुविधा उपलब्ध आहे.