आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिंद्राची राज्यात ४ हजार काेटींची गुंतवणूक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जहिराबाद - व्यावसायिक वाहन उद्याेग क्षेत्रात महिंद्रा अँड महिंद्रा समूहाच्या कंपनीने छाेट्या आकाराची नवीन ‘जिताे’ ही मिनी ट्रक बाजारात आणली आहे, त्याबाबत कंपनीचे कार्यकारी संचालक डाॅ. पवन गाेयंका यांनी जहिराबाद (तेलंगणा) येथे कार्यक्रमात घाेषणा केली. याच वेळी महाराष्ट्रातील चाकण प्रकल्पात पुढील तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने तब्बल चार हजार काेटींची गुंतवणूक करून त्याचे विस्तारीकरण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

लहान आकाराच्या वाहन क्षेत्रात विस्तार करताना महिंद्रा कंपनीने मंगळवारी तेलंगणातील जहिराबाद प्रकल्पाच्या आवारात ‘जिताे’ नावाच्या मिनी ट्रकचे सादरीकरण केले. या प्रसंगी पत्रकार परिषदेत डाॅ. गाेयंका व कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण शहा यांनी संयुक्तपणे माहिती दिली. ७०० ते हजार किलाेपर्यंत वजन क्षमता वाहून नेणारे जितो हे ८ मिनी ट्रक्सच्या श्रेणीत उपलब्ध करून देण्यात आले आहे. स्पर्धकांच्या तुलनेत तब्बल ३० टक्के जादा नफा मिळवून देण्याचा दावाही त्यांनी केला.

वरिष्ठ उपाध्यक्ष विजय नाकरा यांनी निर्मितीविषयी सांगितले की, एक टन लोड विभागातील ग्राहकांच्या गरजा मिनी-ट्रक पूर्ण करणार आहे. २.३२ लाख रुपयांपासून जिताेच्या किमती सुरू होत असून, त्या एस, एल व एक्स मालिकेत उपलब्ध आहेत.
काही वर्षांपासून वाहन उद्याेग क्षेत्रात आलेले मंदीचे सावट दूर हाेऊन खर्‍या अर्थाने ‘अच्छे दिन’ येण्यास जिताेच्या सादरीकरणाने सुरुवात हाेण्याची अपेक्षा आहे. महिंद्रा समूहाने दोन लाख लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. - प्रवीण शहा, सीईओ, महिंद्रा (आॅटाेमाेटिव्ह)
जितो केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’चे उत्तम उदाहरण आहे. मॉड्युलर प्लॅटफॉर्म असलेले जितो छोट्या आकाराच्या व्यावसायिक वाहनांच्या उद्याेगात सकारात्मक बदल घडवून आणेल. - डाॅ. पवन गाेयंका, कार्यकारी संचालक
बातम्या आणखी आहेत...