आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लॉन्च होणार महिंद्राची सर्वात Safest SUV, दमदार इंजिन सोबत 9 एअरबॅग्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑटो डेस्क: महिंद्रा लवकरच भारतामध्ये कार प्रेमींसाठी सॅंग-यंग LIV-2 बेस्ड दमदार SUV लॉन्च करत आहे. महिंद्रा Y400 ही 7 सीटर कार असणार असून सध्या मार्केटमध्ये असणाऱ्या स्टॅब्लिश टोयोटा फॉर्च्यूनर आणि फोर्ड एंडेवर यांना ही कार टक्कर देईल. ही कार दिसायला  मोठी आणि स्टाइलिश आहे. महिंद्रा कंपनी कॉम्पॅक्ट SUV, MUV आणि ऑल न्यू प्रीमियम SUV बनवत आहे.  2017 च्या शेवटी ही कार लॉन्च होण्याची शक्यता... 

- महिंद्रा Y400 मध्ये डिझेल आणि पेट्रोल दोन्ही व्हेरिएन्ट अव्हॅलेबल आहे. 
- पेट्रोल इंजिन 2.0 लीटर GDi टर्बो असून 225 bhp पाॅवर आहे.  
- 349 Nm टॉर्क जनरेट करते आणि  याचे डिझेल इंजिन 2.2 लीटर mHawk टर्बो इतके आहे. 
- यामध्ये 184 bhp पाॅवर असून 420 Nm टॉर्क जनरेट करते. 
- SUV च्या  पेट्रोल इंजिनच्या सोबत  6 स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन दिले आहे. 
- डिझेल इंजिन सोबत 6 स्पीड मॅन्युअल आणि 7 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन दिले आहे. 
- भारतामध्ये या SUV ची एक्सपेक्टेड किंमत 20 ते 28 लाख रुपयांपर्यंत असेल. 
 
सुरक्षिततेचा विचार करता महिंद्राने या कारला हायटेक डिझाइन दिले आहे. महिंद्रा Y400 मध्ये 9 एअरबॅग्स, हिल डीसेंट कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्रॅम, ऍक्टिव्ह रोल, ओव्हर प्रोटेक्शन, अॅडव्हान्स इमरजंसी ब्रेकिंग सिस्टिम आणि ABS सोबत EBD दिले आहे. याशिवाय क्रोम्ड ग्रिल, प्रोजेक्टर हॅड लॅंप्ससह DRLs, LED रिअर लाईट्स, 9.2 इंच टच स्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टिम, 10.1 इंच डिस्प्ले फॉर रिअर ऑक्युपेंट्स, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि  मूड लाइटिंग सारखे हायटेक फीचर्स दिले गेले आहे. 
 
 
पुढील स्लाईडवर पाहा, या कारचे इंटेरिअर आणि एक्स्टेरिअर  PHOTOS ...
 

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...