आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साऊथ सुपरस्टार मामूटीकडे 369 कार्स, मारुती खरेदी करण्‍याची इच्छा अपूर्णच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चित्रपट विश्‍वातील कलाकारांच्या कार क्रेझशी सर्वजण परिचित असाल. त्यांच्या संग्रहात एकापेक्षा एक महागडी आणि लक्झरी कार्स असतात. मात्र तुम्हाला जाणून आश्‍चर्य वाटेल, की मळ्यालम् आणि तमिळ चित्रपटांमधील महानायक मामूटीजवळ एक नाही तर 369 कार्स आहेत. इतकेच नाही तर काही वर्षांपूर्वी देशातील पहिली मारुती-800 ही खरेदी करण्‍याची इच्छा त्याने व्यक्त केली होती. ती पूर्ण होऊ शकली नाही.
सध्‍या चेन्नईच्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आलेल्या मामूटीने आपल्या कार्ससाठी वेगळे गॅरेज बनवले आहे. यातील बहुतेक कार्स ही त्याच्या बंगल्या भोवती पार्किंग केलेल्या दिसतील. ममूटीला कार चालवायल आवडते. तो बहुतेक वेळेस कारसोबत दिसला आहे.
संग्रहात ही आहेत कार्स :
महानायक मामूटीकडे जग्वार XJ-L (कॅवियर) सर्वात लेटेस्ट मॉडेल कार आहे. तिचे दोन्ही व्हर्जन(पेट्रोल-डीझेल) त्याने खरेदी केले आहे. त्याच्या बहुतेक कार्स 369 हा क्रमांक अवश्‍य असतो. या व्यतिरिक्त ममूटीच्या संग्रहात,
- टोयोटा लँड क्रूझर LC 200
- फरारी
- मर्सिडीज आणि ऑडीचे अनेक मॉडल
- पोर्श
- टोयोटा फॉरच्यूनर
- Mini Cooper S,
- F10 BMW 530d आणि 525d, E46 BMW M3
- Mitsubishi Pajero Sport,
- फोक्सवॅगन पॅसेट X2

आणि अनेक एसयूव्हीसह असंख्‍या गाड्या आहेत. ममूटीजवळ आइशरची एक कॅरावॅनही आहे. जी त्याने मॉडीफाय केली आहे. मामूटी हा दक्षिणेत ऑडी खरेदी करणारा पहिला अभिनेताही आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, मारुती खरेदी करणार होते ममूटी आणि त्यांच्या 369 गाड्यांच्या संग्रहाविषयी...