Home | Business | Auto | Maruti Suzuki extended warranty plan for 5 yrs, read benefits

मारुती कार्सवर 5 वर्षांपर्यंतची एक्सटेंडेड वॉरंटी, मिळतील हे फायदे

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 07, 2017, 12:58 PM IST

नवी दिल्ली- देशातील सर्वांत मोठी कार कंपनी मारुती सुझुकीने ग्राहकांना जास्त लाभ देण्यासाठी नवीन प्रोग्राम सुरु केला आहे.

 • Maruti Suzuki extended warranty plan for 5 yrs, read benefits
  नवी दिल्ली- देशातील सर्वांत मोठी कार कंपनी मारुती सुझुकीने ग्राहकांना जास्त लाभ देण्यासाठी नवीन प्रोग्राम सुरु केला आहे. आफ्टर सेल्स आणि सर्व्हिस सुधारण्यासाठी Forever Yours नावाने सर्व प्रकारच्या कारसाठी एक्सटेंडेड वॉरंटी प्रोग्राम लॉंच केला आहे. यात नेक्सा शोरुमच्या माध्यमातून विकल्या जाणाऱ्या कार्सचाही समावेश आहे.
  आतापर्यंत मारुती सुझुकीच्या सर्व कार्सवर स्टॅंडर्ड २ वर्षे म्हणजेच ४० हजार किलोमीटरपर्यंत वॉरंटी दिली जायची. आता यात वाढ करण्यात आली आहे. तुम्ही कोणते पॅकेज घेता यावर हे अवलंबून आहे. एक्सटेंडेड वॉरंटी प्रोग्रामचा उद्देश सर्व्हिस एक्सपिरियंस सुधारण्यासह व्हेयकलचा देखभाल खर्च कमी करणे हा आहे.
  मारुती सुझुकी एक्सटेंडेड वॉरंटी प्लॅनच्या तीन ऑफर्स
  गोल्ड- ३ वर्षे, ६० हजार किलोमीटर
  प्लॅटिनम- ३ आणि ४ वर्षे, ८० हजार किलोमीटर
  रॉयल प्लॅटिनम- ३ वर्षे, ४ वर्षे आणि ५ वर्षे, १ लाख किलोमीटर
  कोणत्याही पॅकेजमध्ये कंपनी वर्षे किंवा किलोमीटर जे आधी पूर्ण होईल त्याचा विचार करेल.
  पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा, या पॅकेजेसमध्ये आणखी काय आहे सामिल...

 • Maruti Suzuki extended warranty plan for 5 yrs, read benefits
  सर्व्हिसमध्ये काय आहे सामिल
  एक्सटेंडेड वॉरंटी अंतर्गत कव्हर होणाऱ्या पार्टमध्ये इंजिन, टर्बोचार्जर, असेम्बली, हायप्रेशर पंप, कॉम्प्रेसर, इलेक्ट्रॉनिक कंट्रोल मॉड्यूल (ईसीएम), स्टार्टर मोटर असेम्बली, स्टिअरिंग असेम्बली, स्ट्रट्स आदी सामिल आहे. पण बल्ब, बॅटरी, टायर्स, स्पार्क प्लग, ब्रेक लायनिंग, बेल्ट, होसेस, फिल्टर आदींची वॉरंटी अंतर्गत कव्हर नसते. याची संपूर्ण लिस्ट बघण्यासाठी कंपनीच्या वेबसाईटला भेट द्या.
 • Maruti Suzuki extended warranty plan for 5 yrs, read benefits
  नेक्सा आऊटलेटची स्कीम
  तीन एक्सटेंडेड वॉरंटी प्लॅन मारुती सुझुकी एरेना डिलरशिप अंतर्गत विकल्या जाणाऱ्या मॉडेल्ससाठी उपलब्ध आहे. नेक्सा आऊटलेट अंतर्गत विकल्या जाणाऱ्या कारला केवळ रॉयल प्लॅटिनम आणि प्लॅटिनम स्कीम उपलब्ध आहे. नेक्सा अंतर्गत एस-क्रॉस, इग्निस, बलेनो आणि शिआज सेडान कार विकल्या जातात.
 • Maruti Suzuki extended warranty plan for 5 yrs, read benefits
  या स्कीमचा फायदा ग्राहकांना
  या स्कीमचा फायदा उचलत ग्राहक वॉरंटी पिरिअडमधील खर्च कमी करु शकतात. तसेच गाडीचा एक्सपिरिअन्स आणखी चांगला करु शकतात. अधिक माहितीसाठी कंपनीच्या वेबसाईटला किंवा आऊटलेटला भेट द्या.

Trending